शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

अरे व्वा! येलदरीतून पिकांना पाणीही मिळणार अन् विज निर्मीतीही सुरु

By मारोती जुंबडे | Published: February 21, 2023 7:34 PM

येलदरीतून सोडले पाणी; ६० हजार हेक्टरवरील उन्हाळी पिकांना फायदा

येलदरी : येलदरी धरणातून वीज निर्मितीच्या तीन संचापैकी दोन संचामधून दररोज ४ दलघमी एवढे पाणी २१ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता सोडण्यात आले आहे. यामुळे येलदरी धरणावर अवलंबून असलेल्या नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील जवळपास ६० हजार हेक्टर वरील उन्हाळी हंगामातील पिकासाठी पाण्याचा लाभ होणार आहे. तसेच येलदरी येथील जल विद्युत केंद्रही सुरू होऊन १५ मेगावॅट एवढी वीज निर्मिती सुरू झाली आहे.

येलदरी धरणातून उन्हाळी हंगामातील प्रमुख असलेल्या भुईमूग व ऊस या पिकासाठी आता पाण्याचे दुसरे अवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी येलदरीतून सिद्धेश्वर धरणात नदी वाटे नेले जाते. सिद्धेश्वर मधून पूर्णा मुख्य कालवा, हट्टा, लासीना, वसमत व अंतिम शाखा कालवा या पाच कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी जलसंपदा विभाग नियोजन करत आहे. या पाच कालव्यामधून परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील मिळून ५७ हजार ९८८ हेक्टर जमीनीवरील उन्हाळी पिकांना या पाण्याचा लाभ होणार आहे. तसेच या पाण्यामुळे या भागातील शेतीसह तीन जिल्ह्यातील २५० हुन अधिक गावांना देखील भर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. यामध्ये परभणी , हिंगोली, पूर्णा, वसमत, जिंतूर या मोठ्या शहरांचा समावेश आहे. त्याचबरोबर उन्हाळी हंगामासाठी येलदरीतून पाणी सोडल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने मोठा फायदा होणार आहे. तसेच येलदरी येथील जल विद्युत केंद्रही सुरू होऊन १५ मेगावॅट एवढी वीज निर्मिती सुरू झाली आहे.

चार वर्षापासून धरण तुडूंब२०१९ पासून येलदरी धरण सातत्याने १०० टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक नुकसानीची भरपाई करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी सोडलेल्या पाण्याचा उपयोग योग्य पध्दतीने करावा, तसेच ठिबक व तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा व पाण्याची बचत करावी असे आवाहन जल संपदा विभागाचे नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता बिराजदार यांनी केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरण