४०६ नागरिकांची दिवसभरात तपासणी
परभणी : जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये रविवारी ४०६ नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. महानगरपालिकेच्या रुग्णालयात १३१, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५, अस्थिव्यंग रुग्णालयात २, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ८५, गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात ४८, पूर्णा तालुक्यात १०, सोनपेठ तालुक्यात १०७ आणि सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात नऊ जणांची तपासणी करण्यात आली आहे.
१४० नागरिकांचे नमुने नाकारले
परभणी : जिल्हा कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. प्रशासनाने आतापर्यंत घेतलेल्या नमुन्यांपैकी १४० नागरिकांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेने नाकारले आहेत. जिल्ह्यातील १ लाख ३४ हजार ५२५ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या असून, त्यात १ लाख २५ हजार ६ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. ५९२ नागरिकांचे अहवाल अनिर्णायक असून, १४० नागरिकांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेने नाकारले आहेत.