मागील चार दिवसांत पालम तालुक्यातील केवळ ९१ जणांनी ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करून तहसील कार्यालयात दाखल केले आहेत. दोन दिवसांपासून संकेतस्थळावर तांत्रिक समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे अर्ज ऑनलाईन दाखल करणे कठीण बनले आहे. २८ डिसेंबर रोजी सकाळी ९ पासून रात्री २ वाजेपर्यंत केवळ दोनच उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन दाखल झाले. त्यामुळे अर्ज दाखल करण्यास आलेल्या उमेदवारांना दिवसभर ताटकळत थांबावे लागले. अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस शिल्लक असल्याने आपला नंबर लागावा, यासाठी अनेक उमेदवार व पॅनलप्रमुखांनी रात्री जागता पहारा देत मुक्काम ठोकला आहे. त्यांनी मंगळवारी सकाळी याबाबत संताप व्यक्त करून ऑनलाईन अर्ज दाखल करायचे तर तांत्रिक अडचणी आधी दूर करा, अशी मागणी केली.
१८ तासांत केवळ दोन उमेदवारी अर्ज ऑनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:22 AM