शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
4
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
5
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
6
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
7
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
8
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
9
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
10
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
11
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
12
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
13
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
14
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
15
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
16
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
17
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
18
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
20
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी

परभणी जिल्हाधिकाºयांचे आदेश :...तर कर्मचाºयांचे वेतन अदा करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:34 AM

तहसील कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना आधार बेसड् बायोमॅट्रिक बंधनकारक असून, जे कर्मचारी या पद्धतीत हजेरी सादर करणार नाहीत, अशा कर्मचाºयांचे वेतन अदा करू नयेत, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तहसील कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना आधार बेसड् बायोमॅट्रिक बंधनकारक असून, जे कर्मचारी या पद्धतीत हजेरी सादर करणार नाहीत, अशा कर्मचाºयांचे वेतन अदा करू नयेत, असे सक्त आदेश जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत़जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता यावी आणि नागरिकांची कामे व्हावीत, या उद्देशाने जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील कर्मचाºयांना आधार बेसड् बायोमॅट्रिकच्या सहाय्यानेच हजेरी नोंदविण्याचे आदेश दिले आहेत़ मात्र महसूल प्रशासनातील तलाठी व मंडळ अधिकाºयांनी या हजेरीला विरोध केला होता़ तलाठी, मंडळ अधिकारी हे फिल्डवर असतात़ त्यामुळे या कर्मचाºयांना आधार बेसड् बायोमॅट्रिक बंधनकारक करू नये, अशी मागणी केली होती़ मात्र जिल्हाधिकाºयांनी ही मागणी फेटाळून लावली होती़ त्यानंतर तलाठी व मंडळ अधिकाºयांना २१ डिसेंबर २०१७ पर्यंत आधार बेसड् बायोमॅट्रिकसाठी नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते़ त्यानंतरही अनेक तलाठी व मंडळ अधिकाºयांनी नोंदणी केली नाही़ ही बाब जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या निदर्शनास आली़ त्यामुळे या प्रकरणी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी ११ जानेवारी रोजी स्वतंत्र परिपत्रक काढले आहे़ त्यात आधार बेसड् बायोमॅट्रिक संदर्भात जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना नव्याने निर्देश दिले आहेत़ त्यानुसार आधार बेसड् बायोमॅट्रिकची नोंदणी न करणे ही अतिशय गंभीर बाब असल्याचेही या पत्रकात नमूद केले आहे़ ज्या मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांनी अद्यापपर्यंत आधार बेसड् बायोमॅट्रिक मशीनद्वारे उपस्थिती नोंदविण्यासाठी रितसर नोंदणी केली नाही, त्यांनी अशी नोंदणी तत्काळ करावी, असे निर्देशही या परिपत्रकात देण्यात आले आहेत़ दरम्यान, जिल्हाधिकाºयांनी आधार बेसड् बायोमॅट्रिक उपस्थितीती बंधनकारक केल्यामुळे कर्मचाºयांची उपस्थिती वाढली आहे़ ग्रामीण पातळीवरही ही प्रक्रिया सुरू केल्यास ग्रामस्थांच्या अडचणी सुटण्यास मदत होणार आहे़ त्यामुळे ग्रा़पं़स्तरावर याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे़२ फेब्रुवारीपर्यंत तहसीलदारांकडे उपस्थिती दाखल कराआधार बेसड् बायोमॅट्रिक उपस्थिती नोंदविण्या संदर्भात जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी सर्व विभागप्रमुखांना यापूर्वीच निर्देश दिले होते़ जानेवारी महिन्यातील उपस्थिती ही आधार बेस्ड बायोमॅट्रिक पद्धतीनेच घेतली जाणार आहे़ त्यामुळे १ जानेवारी २०१८ पासून प्रत्येक महिन्यात तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी महिनाभराची दैनंदिनी पुढील महिन्याच्या २ तारखेपर्यंत तहसीलदारांकडे सादर करावी़ जे तलाठी, मंडळ अधिकारी ही दैनंदिनी सादर करणार नाहीत, त्यांचे त्या महिन्याचे वेतन अदा करू नये, असे निर्देशही या परिपत्रकात तहसीलदारांना देण्यात आले आहेत़ जिल्ह्यातील बहुतांश तलाठी आणि मंडळ अधिकाºयांनी अद्याप नोंदणीच केली नाही़ त्यामुळे या कर्मचाºयांची जानेवारी महिन्यातील १० तारखेपर्यंतची उपस्थिती कशी नोंदविणार व त्यावर काय कारवाई होणार? याविषयी प्रश्न निर्माण होत आहेत़