या वर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, अजूनही पाऊस सुरूच आहे. सोमवारी रात्री जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. सेलू तालुक्यात सर्वाधिक सरासरी ५६.४ मिमी पाऊस झाला आहे. त्या खालोखाल मानवत तालुक्यात ३५.५, पाथरी तालुक्यात ३०.९ आणि परभणी तालुक्यात ३०.८ मिमी पावसाची नोंद झाली, तसेच जिंतूर तालुक्यात २९.७ मिमी पाऊस झाला आहे. सोनपेठ, पालम, गंगाखेड आणि पूर्णा या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी होते.
अनेक भागांत अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला, त्यात सेलू तालुक्यातील सेलू मंडळांमध्ये ६८ मिमी, चिकलठाणा मंडळात ६६ मिमी आणि मोरेगाव मंडळात ७० मिमी पाऊस झाला असून, या मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. याशिवाय परभणी तालुक्यातील पेडगाव मंडळात ६३.८ मिमी आणि जिंतूर तालुक्यातील चारठाणा मंडळात ६० मिमी एवढा अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे.
२२ टक्के अधिक पाऊस
दर वर्षी पावसाळी हंगामात सरासरी ७६१ मिलिमीटर पाऊस होतो. मात्र, या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत ९३१ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत २२ टक्के अधिक पाऊस झाल्याने पिकांना फटका बसला आहे.
कोणत्या तालुक्यात किती पाऊस (मिमीमध्ये)
परभणी ९१७
गंगाखेड ६६८
पाथरी १,१०६
जिंतूर ८७४
पूर्णा ९३१
पालम १,०१९
सेलू ९२२
सोनपेठ ८७३
मानवत ९३८
एकूण ९३१