शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

Parabhani: परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यास कॅबिनेटची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 7:43 PM

परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

परभणी: गेल्या वर्षी मराठवाडा मुक्तीदिनी औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. त्यानंतर आता आज या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली.

काय म्हणाले अशोक चव्हाण?अशोक चव्हाण यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली. ते म्हणाले, 'मंत्रिमंडळाच्या आजच्या निर्णयानुसार परभणी येथे पुढील 4 वर्षात 682 कोटी रुपये खर्च करुन 100 प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व 403 खाटांचे संलग्नित रुग्णालय उभारले जाईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण तर नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होईल.'

सरकारचे मानले आभार'महाविकासआघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाने परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय उभारण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे परभणीकरांची जुनी मागणी पूर्ण झाली असून, काँग्रेसचा परभणी जिल्ह्याचा संपर्क मंत्री या नात्याने मी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मंत्रिमंडळाचा आभारी आहे.'

परभणीकरांची अनेक वर्षांपासूनची मागणीपरभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या चार वर्षांपासून सर्वपक्षीय नेत्यांच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत होते. विशेषत: गेल्या तीन वर्षांपासून परभणीचे शिवसेना खासदार बंडू जाधव यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता आज या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्यामुळे परभणीकरांनी पाहिलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न आता साकार होणार आहे.  

टॅग्स :parabhaniपरभणीUddhav Thackerayउद्धव ठाकरेMedicalवैद्यकीय