परभणी : शहरातील खानापूर भागामध्ये पाणी टंचाई निर्माण झाल्याने येथील नागरिकांनी खानापूर ते महापालिकेपर्यंत मोर्चा काढून आपल्या मागण्या मनपासमोर मांडल्या.
खानापूर नगर भागात महापालिकेने जलवाहिनीचे काम केले आहे. मात्र ही जलवाहिनी मुख्य वाहिनीला जोडली नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे सध्या हातपंपाचे पाणी आटले असून नागरिकांना टंचाई जाणवत आहे. याच पाणी प्रश्नावर सोमवारी सकाळी ११ वाजण्याचा सुमारास नागरिकांनी मोर्चा काढला.
खानापूरपासून वसमत रस्त्याने निघालेला हा मोर्चा महापालिकेवर धडकला. या मोर्चामध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ढोल ताशाच्या गजरात नागरिकांनी घोषणाबाजी केली व पाणी देण्याची मागणी मनपा प्रशासनाकडे केली.
पहा व्हिडीओ :