लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा २१ आॅगस्ट रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात यानिमित्त जाहीर सभा होणार आहेत. त्यामुळे हे तीन मतदारसंघ भाजपाच्या रडारावर असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे.राज्यातील विधानसभा निवडणुका आॅक्टोबरमध्ये होणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात यासाठीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे या निवडणुकांवर डोळा ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅगस्टपासून राज्यस्तरीय महाजनादेश यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून भाजपाचे मतदारसंघ मजबूत करणे व पक्षाचा अजेंडा पुन्हा एकदा जनतेपर्यंत घेऊन जाणे असा मुख्यमंत्र्यांचा उद्देश असल्याने त्या दृष्टीकोनातून या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून ही यात्रा परभणी जिल्ह्यात २१ आॅगस्ट रोजी दाखल होत आहे. या निमित्त या दिवशी दुपारी २ वाजता सेलू येथे तर दुपारी ३.३० वाजता पाथरी आणि सायंकाळी ६ वाजता परभणी येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघ सध्या युतीतील जागा वाटपावरुन शिवसेनेकडे असला तरी माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर हे भाजपात गेल्याने सेनेचा हा मतदारसंघ भाजपाकडेच जाण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीकोनातूनच सेलूत मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित केल्याची चर्चा होत आहे. याशिवाय पाथरी विधानसभा मतदारसंघही युतीतील जागा वाटपानुसार शिवसेनेकडेच आहे; परंतु, अपक्ष आ.मोहन फड यांनी भाजपात प्रवेश केल्याने ही जागाही भाजपाकडेच राहण्याची शक्यता आहे. शिवाय पाथरी शहर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे हा बालेकिल्ला काबीज करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची सभा पाथरीत आयोजित केल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे या सभेची आ. मोहन फड यांच्याकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांची तिसरी सभा परभणी शहरात होणार असून हा मतदारसंघही शिवसेनेकडेच आहे. शिवसेना-भाजपाची युती झाल्यास हा मतदारसंघ सेनेकडेच कायम राहणार, हे निश्चित आहे. जर सेना- भाजपाची युती झाली नाही तर ऐनवेळी पक्षाची धावपळ नको म्हणून आणि जिल्हाभरात भाजपाचा संदेश जावा, या उद्देशाने परभणी येथे मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित केल्याची चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचा या दिवशी परभणीत मुक्काम आहे. त्यामुळे या महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यात फारसी ताकद नसलेल्या भाजपाची विचारधारा मजबूत करण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्देश असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.मराठवाड्यातील इतर ७ जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी हाच एकमेव जिल्हा आहे, जेथे भाजपाची फारसी ताकद नाही. त्यामुळेच या जिल्ह्याला टार्गेट करुन तीन विधानसभा मतदारसंघाला लक्ष करण्यात आले असल्याचे समजते.शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते चलबिचल४मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेनिमित्त जिंतूर, पाथरी व परभणी विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा होणार आहेत. हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ सद्यस्थितीत शिवसेनेकडे आहेत. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांची येथे सभा होणार असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे.४पाथरीमध्ये भाजपाकडून आ. मोहन फड व जिंतूरमधून माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर हेच उमेदवार राहणार हे निश्चित आहे. त्यामुळे जिंतूर व पाथरी विधानसभा मतदारसंघातून तयारी करीत असलेले शिवसेनेचे इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. परिणामी या दौºयाकडे काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचेच अधिक लक्ष राहणार आहे.परभणीत भाजपाची तयारीसाठी बैठक४मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या तयारीच्या अनुषंगाने परभणी येथे गुरुवारी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.४या बैठकीत पक्षाचे मराठवाडा संघटन मंत्री भाऊसाहेब देशमुख, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगर अध्यक्ष आनंद भरोसे, प्रवक्ते शिरीष बोराळकर आदींची उपस्थिती होती.
परभणी : ३ विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या रडारावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:16 AM