लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून दिल्या जाणाऱ्या रकमेचा ३ कोटी ५३ लाख ३५ हजार ५०० रुपयांचा निधी पालम तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे़पालम तालुक्यात ७ हजार ८०० शौचालय बांधणे शिल्लक आहे़ ३१ डिसेंबरपूर्वी ही शौचालये बांधावयाची असून, शौचालय बांधकाम झाल्यानंतर प्रोत्साहन निधीसाठी संबंधित ग्रामपंचायतींकडे संपर्क साधावा, असे आवाहन जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी केले आहे़ दरम्यान, बुधवारी पालम पंचायत समितीत समन्वय समितीची बैठक पार पडली़ यावेळी वासोचे विभागीय समन्वयक अरुण रसाळ, अतिरिक्त सीईओ विजय मुळीक, प्रकल्प संचालक प्रताप सवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, यादव, एम़व्ही़ करडखेलकर, गटविकास अधिकारी संजय धाबे यांची उपस्थिती होती़ नोडल अधिकारी व ग्रामसेवकांनी मुदतीच्या आत शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज यांनी दिल्या़कोल्हावासियांनी घेतला निर्णय३१ डिसेंबरपूर्वी संपूर्ण गावात शौचालय बांधकाम करुन गाव स्वच्छ करण्याचा निर्धार मानवत तालुक्यातील कोल्हा येथील ग्रामस्थांनी केला आहे. कोल्हा जिल्हा परिषद गटातील अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला सदस्यांची नियोजन बैठक १८ डिसेंबर रोजी पार पडली. या गटांतर्गत असलेले शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना या बैठकीत गटविकास अधिकारी जाधव यांनी दिल्या. शौचालय नसणाºया ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांना शौचालय बांधकाम करण्यास प्रवृत्त करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका, स्वयंसाह्यता बचत गटाच्या सदस्यांना देण्यात आली आहे. या जिल्हा परिषद गटात १३ गावांत ९७८ वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यावेळी मुंबई येथील विभागीय समन्वयक अरुण रसाळ यांनी गृहभेटी देऊन शौचालय बांधकामाची तांत्रिक माहिती दिली. यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी मुंढे, अंगणवाडी पर्यवेक्षिका दळवी, वसंत इखे, एस.एस. सय्यद, टी.डी. राठोड, एस.आर. चिलगर, वसंत कांबळे, वसंत वाघमारे, मधुकर उमरीकर, व्यवस्थापक बी.आर. जाधवर, सरपंच सुभाबाई रामकिशन भिसे, उपसरपंच मनोज भिसे, मुकुंद खरवडे आदींची उपस्थिती होती.स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी एलईडी व्हॅन४परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेने आता एल.ई.डी. व्हॅनच्या साह्याने जनजागृती सुरू केली आहे.४१८ डिसेंबर रोजी या व्हॅनचे उद्घाटन करण्यात आले.महाराष्टÑ शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ही एलईडी व्हॅन पाठविली असून, या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे दीडशे ग्रामपंचायतीमध्ये जनजागृती केली जाणार आहे. बुधवारी ही व्हॅन जिल्ह्याला प्राप्त झाली आहे.४शौचालय बांधकाम, त्याचा नियमित वापर, शाश्वत स्वच्छता इ. विषयांवर प्रबोधन केले जाणार आहे. स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही. करडखेलकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही व्हॅन जिंतूर तालुक्यात रवाना करण्यात आली.
परभणी : ३ कोटी ५३ लाखांचा निधी ग्रा़पं़च्या खात्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:42 AM