शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

परभणी : वर्षभरात ७३ नवजात बालकांचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 10:28 PM

एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत विविध कारणांवरुन ० ते ५ वर्षे वयोगटातील ७३ बालकांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. या कालावधीत ३ मातांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या कालावधीत विविध कारणांवरुन ० ते ५ वर्षे वयोगटातील ७३ बालकांचा जिल्ह्यात मृत्यू झाल्याची बाब आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. या कालावधीत ३ मातांचाही मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची जन्मसंख्या, मृत्यू, सर्वात कमी वजनाची बालके आदी संदर्भातील बाबींचा आढावा घेण्यात येतो. या बाबतची माहिती केंद्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयांतर्गत येणाऱ्या हेल्थ मॅनेजमेंट इनफर्मेशन सिस्टीम (एचएमआयएस) अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येत असते. या अनुषंगाने जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने नुकतीच याबाबत शासनाला माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० या १० महिन्यांच्या कालावधीत ० ते ५ वर्षे वयोगटातील ३८ मुली व ३५ मुले अशा ७३ नवजात अर्भक व बालकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. शिवाय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत २ आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत १ अशा दोन मातांचा बाळंतपणात मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एचएमआयएसच्या अहवालानुसार राज्यात १ एप्रिल २०१९ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत १२ हजार १४७ अर्भकांचा मृत्यू झाला असून ११ हजार ६६ बालमृत्यू व नवजात मृत्यू झाले आहेत. तसेच १ एप्रिल २०१९ ते १५ जानेवारी २०२० या कालावधीत १ हजार ७० मातांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. तत्त्पूर्वी २०१८-१९ या कालावधीत १३ हजार ७० नवजात बालकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती एचएमआयएसच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. अकाली जन्मास आलेले बालक, जन्मत: कमी वजनाचे बालक, जंतू संसर्ग, न्यूमोनिया, सेप्सीस, जन्मत: श्वासावरोध, आघात, रेस्पिरेटरी, डिस्ट्रेट सिंड्रोम आदी कारणांमुळे या बालकांचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमदू करण्यात आले आहे.बालमृत्यू , मातामृत्यू: कमी करण्यासाठी या योजना४ १३ व्या वित्त आयोगांतर्गत इंन्टेसीफाईड एचबीएनसी, होम बेस्ड केअर फॉर यंग चाईल्ड, जंत नाशक व जीवनसत्व अ मोहीम, अ‍ॅनिमियामुक्त भारत, अतिसार नियंत्रण पंधरवडा, ३५ अतिसंवेदनशील तालुक्यांचे सनियंत्रण, आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष, नवजात शिशू स्थीरकरण कक्ष,४नवजात शिशू कोपरा, बालउपचार केंद्र, पोषण पुनर्वसन केंद्र, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम, जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रातील आशामार्फत अतिसार, न्यूमोनिया व सेप्सीस आजारांचे व्यवस्थापन४ भरारी पथक योजना, मातृत्व अनुदान योजना, दायी बैठक योजना, मान्सूनपूर्व उपाययोजना, नियमित लसीकरण, बालमृत्यू अन्वेषण, माता आरोग्य संबंधी योजना, गरोदरपणातील संपूर्ण तपासणी व उपचार, संस्थात्मक प्रसुती,४जननी सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना आदी योजना या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात बालमृत्यू व माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राबविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीnew born babyनवजात अर्भक