शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
3
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
4
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
5
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
6
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
7
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
8
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
9
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
10
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
11
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
12
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
13
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
14
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
15
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
16
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
17
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
18
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
19
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
20
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन

परभणी: निकृष्ट खत विकणाऱ्या ५ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 11:58 PM

निकृष्ट व अप्रमाणित खत विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी खत उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वी याच कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): निकृष्ट व अप्रमाणित खत विक्री करुन फसवणूक केल्याप्रकरणी खत उत्पादक कंपनीच्या व्यवस्थापकासह पाच जणांविरुद्ध मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वी याच कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता.मानवत येथील कृषी विभागाच्या पथकाने ५ मे २०१९ रोजी शहरातील गणेश अ‍ॅग्रो एजन्सी या दुकानाची तपासणी केली. त्यावेळी गोवा राज्यातील झुआरी अ‍ॅग्रो केमिकल्स लि. या कंपनीचे सिंगल सुपर फॉस्फेट (दाणेदार खत) विक्रीसाठी ठेवले होते. या खताचे नमुने घेऊन ते औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. या प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाला असून त्यानुसार हे नमुने अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे उत्पादक कंपनीने निकृष्ट दर्जाचे खत उत्पादन करुन वितरण व विक्री केल्या प्रकरणी कृषी विभागाने कंपनीला ८ दिवसांपूर्वी नोटीस दिली होती. मात्र कंपनीने केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने तालुका कृषी अधिकारी पी.एच. कच्छवे यांनी १३ सप्टेंबर रोजी मानवत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन झुआरी कंपनीचे व्यवस्थापक गजानन जयराम कवट यांच्यासह कंपनीचे मालक, संचालक, रसायनशास्त्रज्ञ व व्यवस्थापकाविरुद्ध शासनाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे, ४ सप्टेंबर रोजी पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुभाष तमशेटे यांच्या फिर्यादीवरुन याच कंपनीच्या व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. आता हा दुसरा गुन्हा झाला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी