लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी :जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाचा फटका कापसाच्या उत्पन्नाला झाला असून यावर्षीच्या हंगामात तीन तालुक्यांमधील बाजार समित्यांच्या अंतर्गत ११ लाख ६० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. आवक घटली असली तरी यावर्षी हमीभावाच्या अधिक तुलनेने भाव मिळाल्याने उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.२०१७-१८ च्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यात कापसाचा सर्वाधिक पेरा झाला होता; परंतु, या हंगामात शेवटच्या टप्प्यामध्ये कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली. हातातोंडाशी आलेला कापूस फस्त झाल्याने उत्पादकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. ही परिस्थिती लक्षात घेऊन २०१८-१९ च्या हंगामात अनेक शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनाकडे पाठ फिरविली. त्यामुळे या हंगामात कापसाच्या पेऱ्यापेक्षा अधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे. बोंडअळीचा प्रादूर्भाव पुन्हा उद्भावेल आणि नुकसान सहन करावे लागले, या भितीने अनेक शेतकऱ्यांनी कापसाचे उत्पन्न घेतले नाही. मात्र ज्या शेतकºयांनी कापूस लागवड केली, त्या शेतकºयांना दुष्काळाचा फटका सहन करावा लागत आहे. समाधानकारक पाऊस नसल्याने कापसाच्या उताºयात घट आली आहे. त्यातच या कापसाला चांगला भाव मिळावा, अशी शेतकºयांची अपेक्षा होती.यावर्षी निसर्गाने फटका दिला असला तरी कापसाचे भाव मात्र बºयापैकी वाढले आहेत. परभणी, मानवत आणि सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नोव्हेंबरपासून कापूस खरेदीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात कापसाला प्रति क्विंटल ५ हजार ४०० रुपयांचा भाव मिळाला. त्यामुळे कापसाची आवक संथ गतीने होत होती; परंतु, जाहीर लिलावात कापसाचे भाव वाढत गेले. परभणीसह उर्वरित दोन्ही तालुक्यांमध्ये कापसाचे भाव ६ हजार ३५५ रुपयापर्यंत पोहचले आहेत. खुल्या बाजारपेठेमध्ये हमीभावापेक्षा अधिक भाव मिळणारे कापूस हे एकमेव उत्पादन ठरले आहे. कापसाची आवक मार्च महिन्यापासून वाढली. कापसाला वाढीव भाव मिळाल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मागील वर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी झाले असले तरी हमीभावापेक्षा अधिक भाव मिळाल्याने जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.मानवत बाजाराकडे विक्रेत्यांचा ओढामानवत कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत जिनिंग प्रेसिंगवर कापूस खरेदी केला जात आहे. जाहीर लिलावात मिळालेला भाव दिला जात असून हा भाव हमीभावापेक्षा अधिक आणि जिल्ह्यातील इतर बाजार समितींच्या तुलनेत मानवतमध्ये अधिक भाव मिळत असल्याने जिल्हाभरातून कापूस उत्पादकांनी मानवतमध्ये कापूस विक्री करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे इतर बाजार समित्यांच्या तुलनेत मानवत बाजार समितीमध्ये कापसाची आवक वाढली आहे. परभणी बाजार समितीत ३ लाख ५० हजार क्विंटल कापसाची आवक झाली. सेलू बाजार समितीमध्ये ३ लाख ६० हजार क्विंटल कापूस विक्री झाला आहे. तर दुसरीकडे मानवत कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये १ एप्रिलपर्यंत ४ लाख ५० हजार क्विंटल कापसाची आवक झाली आहे. त्यामुळे मानवत बाजार समितीकडेच शेतकºयांचा कल असल्याचे दिसत आहे.हमीभावापेक्षा एक हजार अधिक दरजिल्ह्यात यावर्षीच्या हंगामात कापसाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळत आहे. कापूस खरेदीला सुरुवात झाली तेव्हापासून हमीभावापेक्षा कमी दर मिळाला नाही. इतर शेतीमालाच्या बाबतीत मात्र खुल्या बाजारपेठेमध्ये हमीदरापेक्षा कमी दर मिळतो. कापसाला ५ हजार १५० रुपये प्रति क्विंटल असा हमीदर असून यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून ५ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर सध्या ६ हजार ३५५ एवढा सर्वाधिक भाव कापसाला मिळाला आहे.
परभणी : ११ लाख क्विंटल कापसाची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 11:29 PM