लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : ग्रामपंचायती ह्या ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असतात; परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थेमधील ग्रा.पं. महत्त्वाची संस्था असूनही तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी १२ ग्रामपंचायतीला स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे या ग्रा.पं.चा कारभार चक्क शाळेची इमारत, मंदिराच्या सभागृहातून चालतो.गावाचा कारभार हा ग्रामपंचायतीमधून पाहिला जातो. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर ग्रामस्थांकडून वसूल केले जातात. तसेच शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जातात. सद्यस्थितीत तालुक्यात ४२ ग्रामपंचायती आहेत; परंतु, ४२ पैकी १२ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार भाड्याच्या खोलीत किंवा पर्यायी जागेतून चालविला जातो. ग्रामस्थांना राज्य शासनाच्या विविध योजनांसह गावपातळीवरील सर्वच कामे गाव सचिवालय उभारून गावातूनच पाहिले जातात; परंतु, बारा ग्रामपंंचायतींना स्वत:ची इमारतच नसल्याने गावातील विकासाची कामे रेंगाळली आहेत.ग्रामपंचायतींचे : दस्तावेज असुरक्षित४गाव पातळीवरील ग्रामपंचायत हे शासकीय कार्यालय असते. ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच गाव, वाड्या, तांड्यावर पायाभूत सुविधा पुरविल्या जातात. त्याचबरोबर गावातील विविध योजनेतील लाखो रुपयांची कामे ग्रामपंचायतीमार्फत राबविले जातात. या कामांची महत्त्वाची कागदपत्रे भाड्याच्या किंवा पर्यायी जागेत ठेवली जातात. त्यामुळे ही कागदपत्रे किती सुरक्षित राहत असतील? असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.ग्रामसभा भरते ओट्यावरतालुक्यातील १२ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसल्याने वर्षभरात होणाऱ्या विविध ग्रामसभा, शाळा किंवा एखाद्या ओट्यावर घ्याव्या लागतात. त्यामुळे या ग्रामपंचायतींना इमारती बांधून द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
परभणी : बारा ग्रा.पं. इमारतीविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 12:50 AM