लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली असून, जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार १६६ विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांची १४ लाख १९ हजार ८०७ पाठ्यपुस्तके बालभारतीकडून जिल्ह्याला प्राप्त झाली आहेत़ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पाठ्यपुस्तक पडावे, या उद्देशाने शिक्षण विभागाने नियोजन केले असून, सध्या पंचायत समितीस्तरावरुन शाळेपर्यंत पुस्तके पोहचती केली जात आहेत़विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत़ जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असते़ या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नयेत आणि पुस्तकांच्या अभावाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशा हेतुने शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबरच अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्युपुस्तके उपलब्ध करून दिली जातात़ शाळेच्या पहिल्याच दिवशी ही पाठ्यपुस्तके मिळावीत, या उद्देशाने शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी तयारी केली आहे़ त्यातूनच विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार मागणी केलेली पुस्तके जिल्ह्यासाठी प्राप्त झाली आहेत़ परभणी जिल्ह्यामध्ये २ लाख ५५ हजार १६६ विद्यार्थी असून, या विद्यार्थ्यांना इतिहास, नागरिकशास्त्र, बालभारती, गणित, भूगोल, सामान्य विज्ञान, सुलभ भारती, माय इंग्लिश बुक, संस्कृत, परिसर अभ्यास आदी विषयांची सुमारे १४ लाख १९ हजार ८०७ पुस्तके प्राप्त झाली आहेत़ ही पुस्तके तालुकास्तरावरही पोहचती झाली असून, त्या ठिकाणाहून शाळानिहाय पुस्तक वाटपाचे काम सध्या सुरू झाले आहे़ पहिली ते आठवी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ही पुस्तके वितिरित केली जाणार आहेत़ मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांनाही पुस्तकांचे वितरण केले जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली़ नवीन शैक्षणिक वर्षांत प्रवेश करण्यापूर्वीच शिक्षण विभागाकडे पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा पुस्तकांचा मोठा प्रश्न निकाली निघाला आहे़ जि़प़ शिक्षण विभागानेही पुस्तक वाटपाला प्राधान्य देऊन सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वितरण करावे, अशी मागणी होत आहे़परभणी जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थीच्जिल्ह्यात पाठ्यपुस्तक वाटपासाठी शिक्षण विभागाने नियोजन केले आहे़ त्यानुसार मराठी माध्यमासाठी परभणी जिल्ह्यात २ लाख १५ हजार ८९५ विद्यार्थी आहेत़च्यात परभणी तालुक्यात २६ हजार ९२७, पूर्णा २२ हजार ९७५, जिंतूर ३४ हजार ९६२, पाथरी १५ हजार ५७७, मानवत १२ हजार ३१२, सेलू २१ हजार ३०६, गंगाखेड २६ हजार ४८५,पालम १४ हजार ७७७, सोनपेठ १० हजार ५१३़च्उर्दू माध्यम परभणी तालुका ८६४, पूर्णा १२०८, जिंतूर ५ हजार १०२, पाथरी ३ हजार ३८९, मानवत १ हजार २९४, सेलू २ हजार १२३, गंगाखेड १ हजार ८१४, पालम ६०८ आणि सोनपेठ ५१६़कोणत्या तालुक्याला मिळाली किती पुस्तकेशिक्षण विभागाकडे उपलब्ध झालेल्या पुस्तकांपैकी परभणी तालुक्याला १ लाख ५३ हजार ९५८, पूर्णा तालुक्याला १ लाख ३३ हजार ५११, जिंतूर तालुक्याला २ लाख २१ हजार ८४६, पाथरी १ लाख ५ हजार ६२, मानवत ७५ हजार ८४०, सेलू १ लाख २९ हजार २९०, गंगाखेड १ लाख ५७ हजार ५६३, पालम ८४ हजार ९६७ आणि सोनपेठ तालुक्याला ६० हजार ५८ पुस्तके प्राप्त झाली आहेत़ तर शहरी भागातील शाळांसाठी २ लाख ९७ हजार ७१२ पुस्तके प्राप्त झाली आहेत़ पहिलीपासून ते आठवी वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके वितरित केली जाणार आहेत़मानवतमध्ये ७५ हजार पाठ्यपुस्तकेलोकमत न्यूज नेटवर्कमानवत : तालुक्यातील १२ हजार ६३७ विद्यार्थ्यांसाठी ७५ हजार पुस्तके शिक्षण विभागाकडे दाखल झाली आहेत़ मोफत पाठ्यपुस्तक योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी बाल भारतीय पाठ्यपुस्तक मंडळाने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत़ मराठी आणि सेमी माध्यमाच्या ११ हजार ४१६ आणि उर्दू माध्यमाच्या १ हजार २२१ अशा १२ हजार ६३७ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके वितरित केली जाणार आहेत़ येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या सभागृहात सध्या पुस्तकांचा साठा करून ठेवला आहे़ केंद्रप्रमुखांच्या मागणीप्रमाणे शाळांच्या मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहचती करण्याचे नियोजन सुरू झाले आहे़ आतापर्यंत मानवत आणि कोल्हा केंद्रातील ४१ शाळांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे़ ६ जूनपासून केकरजवळा आणि मंगरूळ केंद्रातील शाळांना पुस्तकांचे वाटप सुरू आहे़ पुस्तक वाटप करण्यासाठी शिक्षण विभागाने एम़एऩ गुंजे, अनिल जाधव, राजेश फुलवळे, राजकुमार गाडे, दिगंबर गिरी, माजीद शेख, सुनील बेंद्रे, मंगल मचपुरे, सुजाता वाघमारे या कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे़ १० जूनपर्यंत सर्व शाळांना पुस्तके वाटप होतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे़पुस्तकांच्या संख्येत वाढ४गतवर्षी मानवत तालुक्याला ६४ हजार ११३ पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली होती़ यावर्षी पुस्तकांची संख्या ७५ हजार ६८८ वर पोहचली आहे़४विशेष म्हणजे गतवर्षी पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलीची मराठी माध्यमाची ४ हजार ३६२ पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली नव्हती़४मात्र यावर्षी सर्वच पाठ्यपुस्तके उपलब्ध झाल्याने शिक्षण विभागाने समाधान व्यक्त केले आहे़शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे़ या अनुषंगाने सध्या नियोजनानुसार काम सुरू आहे़-संजय ससाने, गटशिक्षणाधिकारी, मानवतएक आठवडा शिल्लकपरभणी जिल्ह्यात १७ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व शाळांपर्यंत पाठ्यपुस्तके पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाकडे आणखी एक आठवड्याचा कालावधी बाकी आहे.
परभणी :१४ लाख पाठ्यपुस्तकांचा साठा उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:09 AM