शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

परभणी: २ महिन्यात १५ बैलजोड्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 12:42 AM

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा खेड्यातून दोन महिन्यात पंधरा बैलजोडी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात आहे; परंतु, पोलीस प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने बोरी ग्रामस्थांनी नुकतीच पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहा खेड्यातून दोन महिन्यात पंधरा बैलजोडी चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद पोलीस ठाण्यात आहे; परंतु, पोलीस प्रशासनाच्या उदासिन भूमिकेमुळे चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने बोरी ग्रामस्थांनी नुकतीच पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.जिंंतूर तालुक्यातील बोरी येथे मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेला परिसरातील २५ ते ३० खेडे जोडली गेली आहेत. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने अनुचित प्रकार टाळण्यासाठी बोरी येथे पोलीस ठाण्याची निर्मिती केली; परंतु, पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या उदासिन भूमिकेचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया कौसडी, रोहिला पिंपरी, कोक, गोंधळा, कान्हड, बोरी, माक, हट्टा येथील शेत आखाड्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून पंधरा बैलजोड्या चोरीला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे कोक येथील बैलजोडी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका आरोपीस पकडून बोरी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्या आरोपीने बैलजोडी चोरी केल्याचे कबूलही केले; परंतु, अद्यापपर्यंत त्या आरोपीकडून बैल कोणाला विकले ? याबाबत पोलिसांना उलगडा करण्यात यश आलेले नाही. त्यानंतर पुन्हा तीन बैलजोडी चोरीच्या घटना घडल्या. यामध्ये कुपटा, पिंपळगाव गायके या ठिकाणी तर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता.गेल्या दोन महिन्यात पंधरा बैलजोडी बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया कार्यक्षेत्रातील चोरीला गेल्या आहेत. पशुपालकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली आहे; परंतु, पोलीस प्रशासनाच्या तपास कामात होणाºया हलगर्जीपणामुळे पशूपालक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पशूपालकांचे पोलीस अधीक्षकांना साकडेबोरी पोलीस ठाण्यांतर्गत दिवसेंदिवस बैल चोरीच्या घटनेत वाढ होत आहे; परंतु, स्थानिक पोलीस प्रशासनाकडूून कोणतीही ठोस पावले उचलण्यात येत नाहीत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडलेल्या आरोपीने गुन्हा कबूल करूनही पुढील तपास होत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी याकडे लक्ष देऊन बैलजोडी चोरांचा बंदोबस्त करावा व पशूपालकांना भयमुक्त करावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. निवेदनावर गणेशराव बहिरट, दीपक बहिरट, विष्णू बहिरट, राजेभाऊ लेंगुळे, सुदाम बहिरट, मधुकर बहिरट, आश्रोबा बहिरट, बाळासाहेब बहिरट, सोपान इक्कर आदींच्या स्वाक्षºया आहेत.गावातही घडले चोरीचे प्रकारज्या गावात पोलीस ठाणे आहे, त्या गावातील ग्रामस्थ निर्धास्त असतात, असे म्हटले जाते; परंतु, जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पोलीस ठाणे अपवादात्मक ठरत आहे. गेल्या आठवड्यात बोरी येथील प्रभाकर शिंपले यांच्या घरासमोर बांधलेली बैलजोडी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेला आठवडाभराचा कालावधी उलटून गेला आहे; परंतु, अद्यापही पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस