शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली; AIIMS रुग्णालयात केले दाखल
2
“निरोप द्यायला सभागृहात यायला हवे ना, फेसबुक लाइव्ह करुन...”; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर
3
“सर्वांत जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भीषण चकमक; 3 पाकिस्तानी दहशतवाद्यी ठार
5
“मी तुमचाच, विरोधी पक्षनेते हे केवळ पद नाही तर...”; राहुल गांधींची प्रतिक्रिया, दिली गॅरंटी
6
पाकिस्तानच्या आरोपांपासून ते ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर होण्याच्या प्रश्नावर Rohit Sharmaची भन्नाट बॅटिंग
7
सेमी फायनलपूर्वी राशिद खानवर ICC ची कारवाई; बांगलादेशविरुद्धच्या लढतीतील चूक भोवली
8
काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
9
"ब्रँड हा ब्रँड असतो! राष्ट्रवादी या ब्रँडला कॉपी करण्याची..."; शरद पवार गटाने सुनिल तटकरेंना डिवचलं
10
मोठी बातमी : भारतीय संघात अचानक करावा लागला बदल, शिवम दुबे... 
11
'बैलगाडीतून जाईन पण Air India मध्ये पुन्हा बसणार नाही', प्रवाशाचा संताप; नेमकं काय झालं?
12
देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? नवनीत राणांनी सविस्तर सांगितले
13
“महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणे जनतेचा अपमान, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या”: विजय वडेट्टीवार
14
“महायुती पक्की, राज्यात पुन्हा डबन इंजिनचे सरकार येईल”; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास
15
₹23 रुपयांचा शेअर सुटलाय सुसाट, आली 'तुफान' तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुबंड, 220% नं वधारला
16
“विधानसभेला महायुतीत अजितदादांच्या वाट्याला २० ते २२ जागा येतील”; रोहित पवारांचा टोला
17
"तुरुंगातून बाहेर येऊ नये यासाठी संपूर्ण यंत्रणा प्रयत्नात"; सीएम केजरीवाल यांच्या अटकेवर पत्नी सुनीता केजरीवाल म्हणाल्या,...
18
ईव्ही क्षेत्रातली बडी कंपनी महाराष्ट्रात येणार; 4000 लोकांना रोजगार मिळणार; फडणवीसांची घोषणा
19
विरोधी पक्षनेते झालेले किती नेते पुढे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले? पाहा...
20
गळाभेट, हातात-हात अन्...; संसद भवनात दिसली चिराग-कंगनाची जबरदस्त केमिस्ट्री! बघा VIDEO

परभणी : १७ गटांतील दीड लाख मे़ टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 1:17 AM

जिल्ह्यातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी, पाथरी आणि सोनपेठ तालुक्यातील १७ गटांमधून गंगाखेड साखर कारखान्याने आतापर्यंत १ लाख ५९ हजार ३१४ मे़ टन उसाचे गाळप पूर्ण केल आहे़ यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत तीनही तालुक्यांमधून ऊस गाळप गतीने होत असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी, पाथरी आणि सोनपेठ तालुक्यातील १७ गटांमधून गंगाखेड साखर कारखान्याने आतापर्यंत १ लाख ५९ हजार ३१४ मे़ टन उसाचे गाळप पूर्ण केल आहे़ यावर्षी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत तीनही तालुक्यांमधून ऊस गाळप गतीने होत असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़परभणी जिल्ह्यामध्ये एकूण ५ खाजगी साखर कारखाने कार्यरत असून, त्यात गंगाखेड साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र सर्वाधिक आहे़ या कार्यक्षेत्रांतर्गत गंगाखेड तालुक्यासह पूर्णा, पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे़ या गावांमधील उसाचे गाळप वेळेत व्हावे, यासाठी कारखाना प्रशासनाने तयारी केली आहे़ चारही तालुक्यांमध्ये कारखान्याचे विभाग निहाय कार्यालय सुरू करण्यात आले असून, या कार्यालयांतर्गत येणाºया गटातील उसाचे टप्प्या टप्प्याने गाळप केले जात आहे़४ जानेवारी रोजी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार गंगाखेड साखर कारखान्याने पाथरी विभागांतर्गत पाथरी गटातील १३ हजार ९ मे़ टन, बाभळगाव गटातील ९ हजार ३८७ आणि हादगाव गटातील १३ हजार ५९५ असा ३६ हजार १ मे़ टन उस गाळप केला आहे़ पोखर्णी विभागामध्ये रामे टाकळी गटा अंतर्गत १५ हजार ५१०, पोखर्णी गटा अंतर्गत १५ हजार ९८३, सिंगणापूर १७ हजार ९२८, लोहगाव ५ हजार ६८६, ताडपांगरी १४ हजार ४०१ आणि भारस्वाडा गटातून १० हजार १६७ असा ७९ हजार ६८५ मे़ टन ऊस गाळप झाला आहे़सोनपेठ विभागामधील सोनपेठ गटा अंतर्गत २ हजार ४३९, लासिना १ हजार ७३, नरवाडी ४ हजार २४१ आणि शेळगाव गटातून २ हजार ४२४ असा १० हजार १७७ मे़टन ऊस गाळप झाला आहे़ गंगाखेड विभागात सोनपेठ तालुक्यातील गटांचाही समावेश होता़ या विभागातून निळा गटात ५ हजार ४५७, खडका गटात १८ हजार ९७७ आणि उखळी बु़ गटातून ९ हजार २७ असा ३३ हजार ४६१ मे़ टन उसाचे गाळप झाले आहे़आतापर्यंत या चारही विभागात १ लाख ५९ हजार ३१४ मे़ टन ऊस गाळप झाला आहे़ पाथरी, मानवत, सोनपेठ, परभणी हे तालुके दुष्काळी यादीत समाविष्ट झाले आहेत़ चारही तालुक्यांमध्ये रबीचा हंगाम झाला नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या आर्थिक उत्पन्नाची भिस्त उभ्या उसावर असून, हा ऊस वेळेत गाळप झाला तर शेतकºयांच्या हाती पैसा पडणार आहे़ ही बाब लक्षात घेऊन आ़ मोहन फड यांनी वरील तालुक्यांमधील संपूर्ण उसाचे वेळेत गाळप व्हावे, यासाठी पुढाकार घेतला़ गंगाखेड साखर कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांची भेट घेऊन कार्यक्षेत्रात उपलब्ध उसाचा आढावा घेत सर्वच्या सर्व ऊस वेळेत गाळप करण्याची मागणी केली़ त्यानुसार कारखान्यानेही नियोजन केले आहे़ऊस उत्पादकांची बैठकया चारही विभागांत मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे़ शुगर बेल्ट म्हणून हे विभाग ओळखले जातात़ सध्या २०२ वाहनांच्या सहाय्याने उसाची वाहतूक होत असली तरी परिस्थिती लक्षात घेऊन आणखी १०० वाहने वाढवावीत, अशी ऊस उत्पादकांची मागणी आहे़ आ़ मोहन फड यांनी ५ जानेवारी रोजी ऊस उत्पादकांसह साखर कारखाना प्रशासनासोबत चर्चा केली़ कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस गाळप व्हावा, यासाठी वाहनांची संख्या वाढवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली़ त्याची दखल घेत कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप केले जाईल, अशी ग्वाही उत्पादकांना दिली आहे़२०२ गाड्यांच्या सहाय्याने उसाची वाहतूक४परभणी, मानवत, पाथरी आणि सोनपेठ या चार तालुक्यांमधील ऊस तोडणी करून तो कारखान्यापर्यंत पोहोचती करण्यासाठी सध्या या विभागामध्ये २०२ वाहने तैनात केली आहेत़ त्यामध्ये पाथरी विभागांतर्गत पाथरी, बाभळगाव आणि हादगाव गटासाठी ३१ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे़ पोखर्णी विभागांतर्गत रामे टाकळी, पोखर्णी, सिंगणापूर, लोहगाव, ताडपांगरी, भारस्वाडा या गटांसाठी ९५, सोनपेठ विभागांतर्गत सोनपेठ, लासिना, नरवाडी आणि शेळगाव गटासाठी ३६ तर गंगाखेड विभागांतर्गत येणाºया सोनपेठ तालुक्यातील निळा आणि खडका या दोन गटांमधील ऊस वाहतूक करण्यााठी ४० वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीSugar factoryसाखर कारखाने