लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करुन घेतली आहेत. रविवारी रात्री उशिरापर्यंत १८ पदाधिकाऱ्यांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहेत.जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाºयांसाठी शासनाकडून वाहने उपलब्ध करुन दिली जातात. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर पदाधिकाºयांना या वाहनाचा वापर करता येत नाही. रविवारी सायंकाळी ५ वाजता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरु केली असून रविवारीच जिल्ह्यातील १८ पदाधिकाºयांची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आली आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच सभापतींची चार वाहने, जिल्ह्यातील ९ पंचायत समितींच्या सभापतींची ९ वाहने, परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींचे वाहन तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांचे वाहनही जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती मिळाली. ही सर्व वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात लावण्यात आली आहेत.निवडणूक कामकाजासाठी जिल्हा प्रशासनाला मोठ्या प्रमाणात वाहनांची आवश्यकता भासते. यासाठी काही वाहने भाडेतत्वावरही घ्यावी लागतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकाºयांसाठी वापरली जाणारी वाहनेही जिल्हा प्रशासनाने जमा करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत कार, जीप, मालवाहू वाहने अशी मिळून ७१ वाहने आहेत.त्यापैकी ३९ वाहने सोमवारी दुपारपर्यंत जमा झाली. जिल्हा प्रशासनाकडे एकूण १० ट्रक आणि ५ बसही उपलब्ध आहेत. ही वाहनेही जमा करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले.शस्त्रेही केली जाणार जमा४निवडणूक कालावधीत शस्त्र वापरण्यासही मनाई आहे. त्यामुळे शस्त्र परवाना असलेल्या नागरिकांकडील शस्त्रेही जमा करुन घेतली जाणार आहेत. परभणी जिल्ह्यात ८८१ जणांना शस्त्र परवाना देण्यात आला असून त्यांच्याकडून हे शस्त्र परत घेतले जाणार आहेत. दरम्यान, या संदर्भात सध्या तरी कुठलीही कारवाई सुरु नाही. लवकरच छाननी समितीची बैठक घेऊन त्यात निर्णय घेतला जाणार आहे. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या या समितीत पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकाºयांचा समावेश आहे. या बैठकीनंतरच प्रत्यक्षात शस्त्र जमा करण्याची कारवाई केली जाणार आहे.काही अधिकाºयांची टाळाटाळ४निवडणूक विभागाचे काम हे राष्ट्रीय काम म्हणून गणले जाते. त्यामुळे या कामासाठी सर्व विभागांनी प्राधान्य देणे गरजेचे असताना काही विभागातील अधिकारी मात्र आपली वाहने जमा करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या अधिकाºयांना वारंवार सूचित करुनही वाहने जमा केली जात नसल्याने सोमवारी वाहन जमा करण्यासंदर्भात नोटीस पाठविण्याची प्रक्रियाही जिल्हा कचेरीत सुरु होती. अधिकाºयांनी आपल्याकडील वाहने तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
परभणी:पदाधिकाऱ्यांची १८ वाहने जिल्हा कचेरीत जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:51 PM