शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

परभणी : कर्मचाऱ्यांना ४ पैकी २ महिन्यांचे वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 12:24 AM

महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या थकलेल्या ४ महिन्यांच्या वेतनापैकी २ महिन्यांचे वेतन शनिवारी बँक खात्यात जमा केल्याने कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. कायम कर्मचाºयांबरोबरच रोजंदारी कर्मचाºयांत देखील वेतन जमा केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या थकलेल्या ४ महिन्यांच्या वेतनापैकी २ महिन्यांचे वेतन शनिवारी बँक खात्यात जमा केल्याने कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. कायम कर्मचाºयांबरोबरच रोजंदारी कर्मचाºयांत देखील वेतन जमा केल्याने समाधान व्यक्त होत आहे.परभणी महानगरपालिकेमध्ये विविध विभागात काम करणाºया अधिकारी आणि कर्मचाºयांची संख्या सुमारे १३०० च्या आसपास आहे. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावत असून खर्चामध्ये वाढ होत असल्याने कर्मचाºयांचे पगार करताना महापालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मनपा कर्मचाºयांच्या पगारासाठी सुरुवातीचे तीन वर्षे सहाय्यक अनुदान उपलब्ध झाले होते. मात्र हे अनुदान बंद झाल्यानंतर कर्मचाºयांचा पगाराचा प्रश्न सतावत आहे. नियमित पगार होत नसल्याने शहरात विकासकामांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिकेला उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस पाऊले उचलावी लागणार आहेत.दरम्यान, मागील चार महिन्यांपासून कर्मचाºयांचे पगार नसल्याने कर्मचाºयांमध्ये नाराजीची भावना होती. दिवाळीचा सण तोंडावर येऊन ठेपल्याने महापालिका प्रशासन किती महिन्यांचा पगार अदा करते, याकडे सर्वच कर्मचाºयांचे लक्ष लागले होते. दरम्यान, शनिवारी मनपातील सर्व कर्मचाºयांना दोन पगार अदा करण्याचा निर्णय झाला आहे.महापालिकेला कर्मचाºयांच्या पगारासाठी प्रत्येक महिन्यात ३ कोटी रुपयांची आवश्यकता भासते. दोन पगार करण्यासाठी किमान ६ कोटी रुपयांची तरतूद मनपाने केली आहे. दोन पगार केल्यानंतरही आणखी दोन महिन्यांचे वेतन मनपाकडे थकलेले आहे. महापालिकेतील कर्मचाºयांना दिवाळी सणापूर्वी दोन महिन्यांचे वेतन अदा झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी मनपा प्रशासनाने कर्मचाºयांच्या वेतनाची तडजोड करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी कर्मचाºयांमधून होत आहे.अशी आहे मनपा कर्मचाºयांची संख्या४महापालिकेमध्ये ७५० कायम कर्मचारी आहेत. १५० रोजंदारी कर्मचारी, ७५ कंत्राटी कर्मचारी, ११० शिक्षक आणि मलेरिया विभागात १३५ कर्मचारी असून या सर्व कर्मचाºयांचा पगार अदा करण्यात आला आहे. कर्मचाºयांचे पगार वितरित झाल्यामुळे दिवाळी सण उत्साहात साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.कर्मचाºयांचे अतिरिक्त भत्तेही केले जमा४मनपातील कायम कर्मचाºयांसाठी राज्य शासनाने वाढीव डी.ए. मंजूर केला आहे. हा डी.ए. वर्षभरापासून प्रलंबित होता. मनपा कर्मचाºयांना दिवाळीच्या निमित्ताने प्रशासनाने डी.ए. जमा केला आहे.मनपा निधी, जीएसटी रकमेचा आधार४महापालिकेतील कर्मचाºयांचे वेतन अदा करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने आणि दिवाळीचा सण तोंडावर आल्याने प्रशासनाने वेतनाच्या प्रश्नावर निर्णय घेतला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत कर्मचाºयांचे वेतन बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होती. देशभरात वस्तू आणि सेवाकर लागू झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर बंद झाले आहेत. त्यामुळे या संस्थांना नुकसानीला सामोरे जावे लागते. हे नुकसान भरुन काढण्यासाठी महापालिकेला शासनाकडून वस्तू आणि सेवाकराची नुकसान भरपाई म्हणून १ कोटी ५४ लाखांचा निधी अदा केला जातो. जीएसटीचा हा निधी आणि महापालिकेच्या स्थानिक निधीतून कर्मचाºयांचे दोन पगार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.१० महिन्यानंतर पगार४महानगरपालिकेअंतर्गत काम करणाºया शिक्षक कर्मचाºयांना मागील १० महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. शनिवारी या कर्मचाºयांचे दोन महिन्यांचे पगार जमा करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिक्षकांच्या पगारासाठी शासनाकडून प्रतिमाह ५० टक्के अनुदानही दिले जाते.४शनिवारी सायंकाळी मनपा प्रशासनाने कर्मचाºयांचे पगार बँक खात्यात जमा केले आहेत; परंतु, दुसराच दिवस सुटीचा असल्याने ज्या कर्मचाºयांकडे एटीएम कार्ड आहे, त्यांना रविवारीच पगार मिळेल. एटीएम कार्ड नसणाºया कर्मचाºयांना मात्र सोमवारपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिकाEmployeeकर्मचारी