लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी शहराबाहेरुन जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यासाठी लागणारी ८४.४५ हेक्टर जमीन संपादित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने २०७ शेत मालकांच्या आक्षेपांवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली असून या शेतमालकांना प्रशासनाने काय निर्णय घेतला, या संदर्भातील लेखी माहिती तलाठ्यांमार्फत देण्यात येणार आहे.परभणी शहराबाहेरुन जाणारा बाह्यवळण रस्ता अनेक वर्षांच्या मागणीनंतर मंजूर झाला आहे. या बाह्यवळण रस्त्यासाठी एकूण ८४.४५ हेक्टर जमीन प्रशासन संपादित करणार आहे. याकरीता ३९ कोटी ५५ लाख २४ हजार ३१९ रुपयांचा मोबदला संबंधित शेतकºयांना देण्यात येणार आहे. त्यामध्ये परभणी परिसरातील ५६ शेतकºयांची ४२.१५ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून यासाठी १८ कोटी २२ लाख ४५ हजार ६४१ रुपयांचा मोबदला देण्यात येणार आहे. परभणी तालुक्यातील पारवा येथील ८ शेतकºयांची १.७६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून यासाठी ५९ लाख ५० हजार २०० रुपयांचा मोबदला देण्यात येणार आहे. वांगी येथील ५८ शेतकºयांची १५ हेक्टर ८९ आर जमीन संपादित करण्यात येणार असून या करीता ५ कोटी ४४ लाख ८० हजार ५८३ रुपयांचा मोबदला देण्यात येणार आहे. असोला येथील ४९ शेतकºयांची १३.९१ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असून यापोटी ६ कोटी ४० लाख ६५ हजार ५२२ रुपयांचा मोबदला शेतकºयांना देण्यात येणार आहे. धर्मापुरी येथील ८५ शेतकºयांची १०.७४ आर जमीन संपादित करण्यात येणार असून यापोटी ८ कोटी ७७ लाख ८२ हजार ३७३ रुपयांचा मोबदला संबंधित शेतकºयांना देण्यात येणार आहे.या शेतकºयांची जमीन संपादित करीत असताना याबाबत आक्षेप दाखल करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. त्यानुसार २०७ शेतकºयांनी आक्षेप दाखल केले. त्यानंतर या आक्षेपांवर २० जानेवारी व ८ फेब्रुवारी असे दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर आता प्रशासनाने यासंदर्भात काय निर्णय घेतला आहे, याबाबतची लेखी माहिती संबंधित शेतकºयांना तलाठ्यांमार्फत देण्यात येणार आहे. तशा नोटिसाही संबंधित शेतकºयांना देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सुनावणी घेतल्यानंतर घेतलेल्या निर्णयाची माहिती पहिल्यांदाच लेखी स्वरुपात संबंधित शेतकºयांना देण्याचा स्तुत्य निर्णय उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी घेतला आहे.प्रक्रिया पूर्ण; निधीची प्रतीक्षापरभणीच्या बाह्यवळण रस्त्यासाठी लागणाºया ८४.४५ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया ही आक्षेप, सुनावणीनंतर पूर्ण झाली असून आता या जमिनीच्या मोबदल्यापोटी संबंधित शेतकºयांना देण्याकरीता ३९ कोटी ५५ लाख २४ हजार ३१९ रुपयांच्या निधीची प्रशासनाला प्रतीक्षा लागली आहे. हा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्यानंतर तातडीने तो संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.भूसंपादन प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने प्रशासनाकडून पूर्ण केली जात आहे. प्रत्येक शेतकºयांच्या आक्षेपांवर सुनावणी घेऊन त्यांना घेतलेल्या निर्णयाची माहिती लेखी स्वरुपात दिली जात आहे. शेतकºयांच्या मोबदल्यासाठी निधी उपलब्ध होताच तातडीने तो त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येईल.-डॉ.संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी
परभणी : २०७ आक्षेपांचे प्रशासन देणार लेखी उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:32 AM