लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी सरत्या हंगामात २१ लाख ७१६ मेट्रीक टन उसाचे गाळप केले असून या कारखान्यांनी शेतकऱ्यांना एमआरपीपोटी २२५ कोटी ६५ लाख रुपयांची रक्कम वितरित केली आहे.जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड शुगर, पाथरी तालुक्यातील लिंबा येथील योगेश्वर शुगर, पाथरी येथील रेणुका शुगर, पूर्णा येथील बळीराजा शुगर आणि परभणी तालुक्यातील त्रिधारा शुगर या पाच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम मार्च महिन्यात संपले आहेत. साधारणत: नोव्हेंबर २०१८ मध्ये कारखान्यांनी ऊस गाळपास सुरुवात केली. गतवर्षी जायकवाडीचे पाणी जिल्ह्याला मिळाल्याने उसाच्या लागवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता होती; परंतु, पाचही साखर कारखान्यांनी चांगल्या प्रकारे गाळप करुन उसाचा प्रश्न मार्गी लावला. या हंगामात गंगाखेड शुगर कारखान्याने ९ लाख १ हजार ११९ मे. टन उसाचे गाळप केले. त्यापोटी या कारखान्याने एफआरपीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ८९ कोटी ५५ लाख रुपये वितरित केले आहेत. आणखी ५१ कोटी ३० लाख रुपये शेतकºयांना वितरित करणे बाकी आहे. लिंबा येथील योगेश्वरी साखर कारखान्याने यावर्षी १ लाख ९५ हजार २ मे.टन उसाचे गाळप केले. त्यामाध्यमातून शेतकºयांना २० कोटी ४० लाख रुपये एफआरपीपोटी वितरित केले. आणखी २१ कोटी ४३ लाख रुपये वितरित करणे बाकी आहेत. पूर्णा येथील बळीराजा साखर कारखान्याने ५ लाख ५६ हजार २८२ मे.टन उसाचे गाळप केले. त्या माध्यमातून ८२ कोटी २५ लाख रुपये एफआरपीद्वारे शेतकºयांना वितरित केले असून आणखी २१ कोटी २ लाख रुपये एफआरपीपोटी शेतकºयांना वितरित करणे बाकी आहे. पाथरी येथील रेणुका शुगर साखर कारखान्याने यावर्षी १ लाख ९० हजार ४६० मे.टन उसाचे गाळप केले. त्यातून एफआरपीपोटी शेतकºयांना २१ कोटी ६४ लाख रुपये वितरित केले आहेत. आणखी १५ कोटी ७३ लाखांची एफआरपीची रक्कम थकित आहे.परभणी तालुक्यातील त्रिधारा शुगर कारखान्याने यावर्षी २ लाख ५७ हजार ८५३ मे.टन उसाचे गाळप केले. एफआरपीपोटी या कारखान्याने शेतकºयांना ११ कोटी ७९ लाख रुपये वितरित केले आहेत. उर्वरित ३६ कोटी ९ लाख रुपये एफआरपीची थकबाकी राहिली आहे. पाच कारखान्यांनी एकूण २१ लाख ७१६ मे.टन उसाचे गाळप केले. त्यापोटी या कारखान्याने २२५ कोटी ६५ लाख रुपये एफआरपीपोटी दिले आहेत. तर १४५ कोटी ५७ लाख रुपये एफआरपी या कारखान्यांकडे बाकी आहे. या संदर्भातील थकित ऊस दर देय बाकीचा गोषवारा १५ एप्रिल रोजी राज्याचे साखर संचालक शेखर गायकवाड यांनी घोषित केला आहे.नृसिंह व महाराष्ट्र शुगर साखर कारखान्यांकडे : १२ कोटी रुपयांची थकबाकीजिल्ह्यातील २ साखर कारखान्यांकडे मागील सर्व गळीत हंगामातील १२ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी राहिली आहे. त्यामध्ये परभणी तालुक्यातील लोहगाव येथील नृसिंह साखर कारखान्याकडे २ कोटी २० लाख ५३ हजार रुपये शेतकºयांचे थकले असून ही रक्कम २०११-१२ या आर्थिक वर्षातील आहे. तसेच सोनपेठ तालुक्यातील महाराष्ट्र शेतकरी शुगर कारखान्याकडे शेतकºयांचे तब्बल ९ कोटी ९२ लाख रुपये थकले आहेत.त्यामध्ये २०१४-१५ मधील ५ कोटी ६९ लाख, २०१५-१६ या आर्थिक वर्षातील ४ कोटी २२ लाख ४७ हजार रुपयांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शेतकºयांचे २ कोटी ५ लाख २५ हजार ९८५ रुपये थकविल्या प्रकरणी या कारखान्याचे चेअरमन अभिजीत देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध नांदेड जिल्ह्यातील मुदखेड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.२५ एप्रिल रोजीच देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश हरिभाऊ वाघमारे यांनी फेटाळला आहे. दरम्यान, २४० शेतकºयांनी फसवणुकीची तक्रार केली होती. अनेक महिन्यांपासून हे शेतकरी थकबाकीची रक्कम मागत आहेत; परंतु, त्यांना दाद दिली जात नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. आता या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरु झाल्याने शेतकºयांना थकबाकीची रक्कम कधी मिळेल, याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे.
परभणी : २१ लाख मे. टन उसाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:57 PM