शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

परभणी :२१ गावांत मनरेगावर छदामही खर्च नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:21 PM

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर राज्य शासन भर देत असताना तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मनरेगांतर्गत एकही काम सुरू नाही़ विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षात या ग्रामपंचायत आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाही़ पर्यायाने गेल्या सहा महिन्यात मनरेगा योजनेवर या गाव क्षेत्रात छदामही खर्च झाला नसल्याची माहिती समोर आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेवर राज्य शासन भर देत असताना तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मनरेगांतर्गत एकही काम सुरू नाही़ विशेष म्हणजे २०१८-१९ या वर्षात या ग्रामपंचायत आणि इतर कार्यान्वित यंत्रणेकडे कामाचा सेल्फच उपलब्ध नाही़ पर्यायाने गेल्या सहा महिन्यात मनरेगा योजनेवर या गाव क्षेत्रात छदामही खर्च झाला नसल्याची माहिती समोर आली आहे़महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत केंद्र शासनाने विविध १९ प्रकारच्या कामांचा समावेश केला आहे़ त्याचबरोबर ११ कलमी कार्यक्रमही हाती घेतला आहे़ दरवर्षी १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत पुढील वर्षीच्या कामाचे आराखडे आणि लेबर बजेट तयार केले जाते़ वास्तविक पाहता केलेले नियोजन हे कागदावरच राहत असल्याचे चित्र मागील काही वर्षांपासून या योजनेतून दिसून येत आहे़ मनरेगा योजनेंतर्गत ५० टक्के कामे यंत्रणास्तर आणि ५० टक्के कामे जि़प़ अंतर्गत ग्रामपंपचायतस्तरावर केली जातात़ मागील काही वर्षांत ग्रामपंचायतस्तरावर बहुतांश कामे सिंचन विहिरींची घेतली जात आहेत़ ग्रामपंचायतीकडूनही त्याच कामांची मागणी होत आहे़यंत्रणास्तरावर शेत रस्ते, नाला सरळीकरण, वृक्ष लागवड, विहिर पुनर्भरण, शेततळी, तुती लागवड या कामांचा समावेश आहे़ यंत्रणास्तरावर सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषी विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, रेशीम कार्यालय या विभागामार्फत कामे केली जातात; परंतु, मनरेगा योजनेच्या कामात सर्वच विभागातील यंत्रणा उदासिन असल्याचे दिसून येत आहे़त्यामुळे पाथरी तालुक्यातील २१ गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे एकही काम सुरू नाही़ त्यामुळे गावात मजुरांना रोजगारही उपलब्ध होत नाही़ तसेच या योजनेवर या २१ गावांमध्ये अद्याप छदामही खर्च झाला नाही़ त्यावरून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे़वृक्ष लागवड : केवळ कागदावरचसामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला जातो़ जून महिन्यात या विभागाने २१ गावांमध्ये एकही काम हाती घेतले नाही़ त्यामुळे राज्य शाासनाचा महत्त्वकांक्षी १३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम कागदावरच राहिला असल्याचे दिसून येत आहे़ तसेच पाथरी तालुक्यातील केवळ बोरगव्हाण या एका गावातच मनरेगा योजनेंतर्गत रेशीम शेतीसाठी तुती लागवड कार्यक्रम गेल्या दोन वर्षांपासून राबविला जात आहे़सध्या तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ सध्या शेतात कामे उपलब्ध नाहीत़ त्यामुळे मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे़ अशा परिस्थितीत प्रत्येक गावात मनरेगाची कामे सुरू होणे आवश्यक आहे़ही आहेत २१ गावेआनंदनगर, बंदरवाडा, बाणेगाव, डाकू पिंप्री, पिंप्री, ढालेगाव, गोपेगाव, जवळा झुटा, वाडी, कानसूर, खेडुळा, लिंबा, लोणी, मंजरथ, मरडसगाव, निवळी, पाटोदा, फुलारवाडी, रामपुरी खु़, सारोळा बु़ व तुरा या गावांमध्ये अद्याप महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एकही काम सुरू झालेले नाही़घरकुल कामासाठी मजूररमाई आवास आणि प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी मनरेगा योजनेत १८ हजार रुपयांची मजुरी उपलब्ध करून दिली जाते़ सध्या तालुक्यात केवळ घरकूल बांधकामासाठीच ३३७ मजूर कामावर आहेत़ त्याशिवाय एकही काम सुरू नाही़ सिंचन विहिरींची कामेही अद्याप सुरू नाहीत़

टॅग्स :parabhaniपरभणीfundsनिधी