लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर: जलसंधारण विभागांतर्गत ग्रामीण भागामध्ये २४ सिंचन बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली असून त्यावर ३२ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत. या बंधाऱ्यामुळे परिसरातील हजारो एकर शेत जमीन सिंचनाखाली येणार आहे.जिंतूर तालुक्यामध्ये मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे झाली. जांब, चारठाणा, भोसी आदी गावांमध्ये जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणावर झाली. त्यामुळे या भागात पाणीपातळी वाढण्यासाठी मोठा फायदा झाला. यावर्षी जलसंधारण विभागाने जिंतूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बंधाºयाची कामे हाती घेतली आहेत.या संदर्भात जलसंधारण विभागाकडून इटोली येथे दोन बंधारे, साईनगर एक, मांडवावाडी १, रवळगाव १, पाचेगाव १ अशा ६ बंधाऱ्यांच्या कामांवर ७ कोटी ३२ लाख रुपये खर्च होणार आहेत. त्याच बरोबर वाईबोथी २, चिकलठाणा २, गिरगाव १, रवळगाव १ या ६ बंधाºयांसाठी ६ कोटी ९९ लाख रुपये मंजूर झाले आहेत.याशिवाय तालुक्यातील आडगाव येथे ४, असोला २ या सहा बंधाºयांच्या कामावर ६ कोटी ७५ लाख रुपये मंजूर आहेत. तालुक्यातील वाईबोथी, गिरगाव, रवळगाव, कवडगव्हाण या चार कामांसाठी ५ कोटी २५ लाख रुपये मंजुरी मिळाली आहे. याशिवाय आडगाव, पाचेगाव, साईनगर, मांडवावाडी येथे प्रत्येकी १ या प्रमाणे एकूण ४ कामांवर ५ कोटी १६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या सर्व कामांना मंजुरी देण्यात आली असून २४ बंधाºयावर ३२ कोटी ७५ लाख रुपये खर्च होणार आहेत. या कामाला निवडणुकीपूर्वीच मान्यता देण्यात आली असून संबंधित कामांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे. जिंतूर तालुक्यातील दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.जलयुक्त शिवारमधील बंधारे चौकशीच्या फेºयात४जिंतूर तालुक्यामध्ये मागील वर्षी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत अनेक बंधाºयांची कामे झाली होती. ही कामे करीत असताना बंधाºयांसाठी लागणारे साहित्य व दर्जा तपासण्यात आला नाही. त्यामुळे अनेक बंधाºयांची कामे बोगस झाल्याची तक्रार जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांनी या तक्रारींच्या अनुषंगाने बंधाºयाची कोरबोर टेस्ट घेण्याचे ठरविले. यामध्ये मोहखेडा, वझर, सावंगी भांबळे, नागणगाव, साखरतळा, असोला वरुड नृसिंह, सुकळी वाडी, गणेशनगर, आडगाव बाजार, आंगलगाव, आंगलगाव तांडा येथील कामांची कोरबोर टेस्ट घेतल्यानंतर अनेक ठिकाणी बोगस कामे झाल्याचे टेस्टमध्ये आढळून आले.पाणीपातळी वाढणार४जिंतूर तालुक्यात नवीन होणाºया या बंधाºयांमुळे त्या त्या भागातील पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्याच बरोबर बंधारा परिसरातील हजारो एकर शेती सिंचनाखाली येणार आहे. विशेष म्हणजे यातील अनेक बंधारे डोंगराळ भागात होणार आहेत. या भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने याचा फायदा जवळच्या गावांना होणार आहे.
परभणी : जिंतूर तालुक्यात २४ बंधारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:38 PM