लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला आजपासून सुरूवात होत असून, जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रावरून २४ हजार २६७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत़बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागासह महसूल प्रशासनाने तयारी सुरू केली आहे़ परीक्षा केंद्रांची निर्मिती, पर्यवेक्षकांची नियुक्ती तसेच बैठे आणि भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे़ ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण, महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ १ हजार ४५६ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून, जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जात आहे़ परभणी तालुक्यात १९ परीक्षा केंद्र असून, या केंद्रांवर ९ हजार ८६३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत़ पूर्णा तालुक्यात ५ परीक्षा केंद्रांवर १ हजार ८३६ विद्यार्थी, गंगाखेड तालुक्यात आठ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ९०, पालम तालुक्यात ४ केंद्रांवर १ हजार ४८४, सोनपेठ २ केंद्रावर ७५२, जिंतूर तालुक्यामध्ये ९ परीक्षा केंद्रांवर ३ हजार ३६९ विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे़ पाथरी तालुक्यात ३ केंद्रांवर १ हजार ८८, मानवत ३ केंद्रांवर १ हजार २९४ आणि सेलू तालुक्यामध्ये ३ केंद्रांवर १ हजार ४९१ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत़ २१ फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाची परीक्षा होणार असून, सकाळी ११ ते २ या वेळेत परीक्षा घेतली जाणार आहे़ शिक्षण विभागाने परीक्षेची पूर्ण तयारी केली असून, कॉपीला आळा घालण्यासाठी बैठे व भरारी पथकांची नियुक्ती केली आहे़
परभणी :२४ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:57 PM