लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांना तिसºया टप्प्यासाठी ४६ कोटी ८५ लाख ६९ हजार रुपयांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले असून, या अनुदानापैकी २५ कोटी ८८ लाख ७५ हजार रुपये प्रत्यक्षात शेतकºयांच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत़ ५५ हजार ८५ शेतकºयांना तिसºया टप्प्यातील अनुदानाचा लाभ मिळाला आहे़२०१६ च्या खरिप हंगामामध्ये जिल्ह्यात कापूस लागवड करण्यात आली होती़ सुमारे २ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पीक घेण्यात आले़ मात्र या कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती़ विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रात बोंडअळीचा फैलाव झाला होता़ जिल्हा प्रशासनाने कृषी विभागाच्या सहाय्याने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये संपूर्ण पीक बोंडअळीने बाधीत झाल्याचा निष्कर्ष काढला होता़ त्यावरून नुकसानग्रस्त शेतकºयांना अनुदान वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला़ जिल्हा प्रशासनाने अनुदानापोटी शासनाकडे रकमेची मागणी केली होती़ तीन टप्प्यात जिल्ह्याला ही रक्कम प्राप्त झाली़ तिसºया आणि शेवटच्या टप्प्यासाठी जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाला ४६ कोटी ८५ लाख ६९ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता़ प्रशासनाने हा निधी तहसील कार्यालयांच्या मागणीनुसार त्या त्या तहसील कार्यालयाला वितरितही केला़ तहसील कार्यालयातून शेतकºयांच्या खात्यावर निधी जमा करण्यासाठी तो बँकांमध्ये वर्ग करण्यात आला आहे़ तहसील प्रशासनाने वितरित केलेल्या निधीचा लेखाजोखा प्राप्त झाला असून, १७ नोव्हेंबरपर्यंत ५५ हजार ८५ शेतकºयांच्या खात्यावर २५ कोटी ७७ लाख ७५ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत़ प्राप्त झालेल्या रकमेपैकी ५५ टक्के रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा झाली असून, उर्वरित कामही सुरू असल्याची माहिती महसूल विभागाने दिली़ जिल्ह्यात तिसºया टप्प्यातील बोंडअळीचे वाटप झाल्यानंतर अनुदान वाटपाचे काम संपणार आहे़ यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, रबीचा हंगाम हातचा गेल्याने शेतकºयांना आर्थिक चणचण जाणवत आहे़ अशा परिस्थितीमध्ये बोंडअळीचे अनुदान खात्यावर जमा होत असल्याने शेतकºयांसाठी ही बाब दिलासा देणारी ठरत आहे़पालम तालुक्यात ८४ टक्के वाटप४तिसºया टप्प्यामध्ये शेतकºयांना अनुदान वाटप करण्यासाठी मिळालेल्या रकमेतून शेतकºयांच्या बँक खात्यावर नुकसान भरपाई म्हणून रक्कम जमा केली जात आहे़ पालम तालुक्याने या कामात आघाडी घेतली असून, तालुक्याला ३ कोटी ८० लाख ४९ हजार रुपये प्राप्त झाले होते़४१७ नोव्हेंबर अखेर ८ हजार ७१७ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी २२ लाख ५३ हजार रुपये जमा करण्यात आले असून, ८४ टक्के शेतकºयांना निधी वितरित झाला आहे़ त्या खालोखाल पाथरी तालुक्यामध्ये १० हजार ६८५ शेतकºयांच्या खात्यावर ४ कोटी ३० लाख ३३ हजार रुपये (८१़४९ टक्के) वितरित करण्यात आले आहेत. परभणी तालुक्यासाठी ८ कोटी ६० लाख ८ हजार रुपयांचा निधी तिसºया टप्प्यात मिळाला आहे़ तालुक्यातील ८ हजार ९१२ शेतकºयांच्या खात्यावर ४ कोटी ५७ लाख ९८ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत़ तालुक्याने ५३़२५ टक्के काम पूर्ण केले आहे़ सेलू तालुक्यात १३ हजार ३५४ शेतकºयांच खात्यावर ६ कोटी ३६ लाख ४० हजार (७७ टक्के), जिंतूर तालुक्या ३ हजार ५८५ शेतकºयांच्या खात्यावर २ कोटी ५ लाख २० हजार (२५ टक्के).४मानवत तालुक्यात ५ हजार ५९८ शेतकºयांच्या खात्यावर ३ कोटी १० लाख २८ हजार (४६़५६ टक्के), सोनपेठ तालुक्यात १ हजार ८० शेतकºयांच्या खात्यावर ६२ लाख ९२ हजार रुपये (१७़९२ टक्के) आणि पूर्णा तालुक्यामध्ये ३ हजार १५४ शेतकºयांच्या खात्यावर १ कोटी ५२ लाख ११ हजार रुपये (५६़७२ टक्के) वाटप करण्यात आले आहे़२ लाख ७१ हजार शेतकºयांना लाभ४कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीपोटी १७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ७१ हजार ६६९ शेतकºयांना नुकसान भरपाई म्हणून अनुदानाचे वितरण झाले आहे़ परभणी जिल्ह्यामध्ये सुमारे ३ लाख १७ हजार शेतकरी असून, या शेतकºयांसाठी १५७ कोटी रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली होती़४या मागणीच्या तुलनेत ३ टप्प्यांमध्ये जिल्ह्याला अनुदान प्राप्त झाले़ पहिल्या टप्प्यात ४२ कोटी रुपये अनुदान मिळाले असून, त्यातून ८६ हजार ८५२ शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली़ दुसºया टप्प्यामध्ये ६३ कोटी २० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले़४या रकमेतून १ लाख २९ हजार ७३२ शेतकºयांना अनुदानाचा लाभ देण्यात आला़ तर तिसºया टप्प्यामध्ये ४६ कोटी ८५ लाख रुपये अनुदान प्राप्त झाले असून, आतापर्यंत ५५ हजार ८५ हजार शेतकºयांच्या खात्यावर हे अनुदान जमा करण्यात आले आहे़
परभणी : २५ कोटी ७७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:47 AM