लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात खरीप हंगामाचे वेध लागले असून कृषी व्यापाऱ्यांनी खताची आवक सुरु केली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यामध्ये २६ हजार ९०० मेट्रिक टन खत साठा उपलब्ध आहे.जिल्ह्यामध्ये दोन वर्षांपासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने यावर्षी शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. असे असले तरी खरीप हंगामाची तयारी व्यापाऱ्यांनी सुरु केली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे साधारणत: ६ महिन्यांपासून मोंढा बाजारपेठ ठप्प आहे. आगामी हंगामात बºयापैकी बाजारपेठेत उलाढाल होईल, या आशेवर खत, बियाणांचा साठा करण्यास सुरुवात केली आहे.पेरणी हंगामासाठी खताची आवश्यकता भासते. जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सरासरी ७३ हजार २०० मे.टन खताचा वापर होतो. कृषी विभागाने मागील वर्षी १ लाख ५१ हजार २०० मे.टन खताची मागणी केली होती. त्यात युरिया ६० हजार ५०० मे.टन, एनपीके ५२ हजार ५०० मे.टन, डीएपी २१ हजार ५०० मे.टन आणि एमओपी ५ हजार ७०० मे.टन मागविण्यात आले होते. मात्र त्या तुलनेत केवळ ९० हजार ४४० मे.टनाचे आवंटन मंजूर झाले. त्यात ३३ हजार १०० मे. टन युरिया, १५ हजार ६० मे.टन डीएपी, ७ हजार ४०० मे. टन एसएसपी, ३ हजार ६६० मे. टन एमओपी आणि ३१ हजार २२० मे. टन एनपीके खत जिल्ह्याला मंजूर झाले होते. मागील हंगामातील या खतापैकी २६ हजार ९०० मे. टन खताचा साठा शिल्लक आहे. हा साठा यावर्षीच्या हंगामात वापरला जाणार असून नव्याने खताची आवकही सुरु झाली आहे. त्यामुळे मालवाहू रेल्वेच्या साह्याने दररोज खत परभणीत दाखल होत आहे. त्यामुळे यंदा मूबलक प्रमाणात खत उपलब्ध होईल, अशी अपेक्षा आहे.दुष्काळाचा परिणाम : सहा महिन्यांपासून उलाढाल ठप्पजिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामामध्ये झालेल्या खरेदी- विक्रीनंतर येथील मोंढा बाजारपेठेतील उलाढाल ठप्प पडली आहे. परतीचा पाऊस न झाल्याने रब्बी हंगामात मोंढा बाजारपेठेतील खरेदी- विक्री ठप्प पडली. त्यानंतर साधारणत: ६-७ महिन्यांपासून या बाजारपेठेत उलाढाल झाली नसल्याची स्थिती आहे.आता खरीप हंगाम जवळ येवून ठेपला आहे. त्यामुळे व्यापाºयांनी आतापासूनच तयारी सुरु केली असून खताबरोबरच बियाणे, कीटकनाशकांचा साठा केला जात आहे. खरीप पेरण्यासाठी खरेदी होणार असल्याने या हंगामावर व्यापाºयांच्या आशा लागल्या आहेत.किंमती वाढल्याने शेतकºयांसमोर संकट४मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी खताच्या किंमती वाढल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकºयांच्या हाती उत्पन्न मिळाले नाही. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. हातात पैसा नसताना खरीप हंगामामध्ये बी-बियाणे आणि पेरणीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याचे नियोजन शेतकºयांना करावे लागणार आहे.४यासाठी पुन्हा एकदा बँकांच्या दारात जावून कर्ज घेऊनच पेरण्या करण्याची वेळ शेतकºयांवर येऊन ठेपली आहे. असे असताना खत कंपन्यांनी मात्र खताच्या किंमती वाढविल्याने शेतकºयांसमोर नवीन संकट उभे टाकले आहे. खताच्या किंमती कमी कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.जिल्ह्यात उपलब्ध खताचा साठा४युरिया ६२००, डीएपी ६५००, एसएसपी १०२००, एमओपी ५००, एनपीके ३५००, एकूण २६९०० मे.टनशेतीच्या मशागतीला सुरुवात४गतवर्षीच्या खरीप हंगामात उत्पन्न न मिळाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला; परंतु, यावर्षीच्या खरीप हंगामातून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा बाळगून मशागतीला सुरुवात झाली आहे.४ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, पाळी घालणे व रोटाव्हेटरची कामे सध्या सुरु आहेत. पावसाच्या आगमनापर्यंत पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेण्याकडे शेतकºयांचा कल आहे. त्यामुळे शेतीत पुन्हा एकदा कामे सुरू झाली आहेत.४कडक उन्हामुळे पहाटे ६ ते सकाळी ११ वाजेपर्यंत शेतकरी कामे उरकून घेत आहेत. तसेच सायंकाळी ५ ते ६ या वेळेतही कामे होताना दिसत आहेत. एकंदरित खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे.
परभणी : गतवर्षीचा २६ हजार मे. टन खत शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:07 AM