शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

परभणी : बँक, घरफोडीतील ५ आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:28 AM

जिल्ह्यातील मानवत, पेडगाव येथील बँक आणि विविध ठिकाणची घरफोडी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ आरोपींना गुरुवारी उशिरा अटक केली आहे. या आरोपींकडून अनेक महत्त्वपूर्ण गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील मानवत, पेडगाव येथील बँक आणि विविध ठिकाणची घरफोडी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ आरोपींना गुरुवारी उशिरा अटक केली आहे. या आरोपींकडून अनेक महत्त्वपूर्ण गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.परभणी तालुक्यातील पेडगाव तसेच मानवत येथे बँक फोडीची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. शिवाय जिल्ह्यात घरफोडी, वाहनांची चोरी आदी घटनाही घडल्या होत्या. चोरटे हाती लागत नसल्याने पोलीस यंत्रणेवर ताण आला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी बँक चोरी व दुकान फोडल्याच्या घटनेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासण्याचे आदेश त्यांच्या पथकास दिले. त्यानंतर मिळालेल्या फुटेजच्या आधारे गुप्त बातमीदाराकडून शोध घेतला असता मानवत तालुक्यातील खडकवाडी येथे आरोपी असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन गुरुवारी स्थागुशाच्या पथकाने छापा टाकून अनिल मारोती पवार (३० रा.खडकवाडी ता.मानवत), लखन भीमराव एरंडकर (२०, रा.कारखाना वसमत), सुरज नितीन जाधव (२०, रा.सांगली ह.मु.कारखाना वसमत), सिन्ना ऊर्फ बालाजी नागोराव गोरे (२४, रा.कारखानारोड वसमत), आत्माराम मारोती पवार (३०, रा.खडकवाडी ता.मानवत) यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांची चौकशी केली असता आरोपींवर मानवत पोलीस ठाण्यात गु.रं.नं.१५६/२०१९ कलम ४५७, ३८० अन्वये बँक फोडणे, लुटमार आदींचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. तसेच परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात १६८/२०१९ कलम ४५७, ३८० भादंवि नुसार बँक फोडणे, पाथरी पोलीस ठाण्यात गु.र.नं.१६६/२०१९ कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये शटर तोडून चोरी करणे, परभणी कोतवाली पोलीस ठाण्यात गु.र.नं.१९०/२०१९ कलम ४५७, ३८० शटर तोडून चोरी करणे, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.४१४/२०१९ कलम ३७९ भादंवि अन्वये मोटारसायकल चोरणे, हट्टा पोलीस ठाण्यात गु.र.नं.१०६/२०१९ कलम ४५७, ३८० भादंवि अन्वये शटर तोडून चोरी करणे, जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येलदरी येथील दारुचे दुकान फोडून चोरी करणे, पूर्णा पोलीस ठाणे हद्दीत दारुचे दुकान फोडून चोरी करणे आदी गुन्हे केल्याचे आरोपींनी कबुली दिली. यावेळी स्थागुशाच्या पथकाने आरोपीकडून कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेला एक आॅटो, मानवत बँक फोडी प्रकरणात वापरलेली चोरीची मोटारसायकल हस्तगत केली असून या आरोपींना तपासकामी मानवत व परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक रागसुधा आर, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, सुनील गोपीनवार, पोह.सुग्रीव केंद्रे, हनुमंत जक्केवाड, निलेश भूजबळ, पो.ना.जमीर फारोखी, अरुण कांबळे यांच्या पथकाने केली.गुन्ह्यांची : होणार उकल४जिल्ह्यात बँक फोडणे, घरफोडी, दुकान फोडणे, वाहनांची चोरी करणे आदींच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने या घटनेतील आरोपींचा शोध लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते.४त्या अनुषंगाने स्थागुशाचे पोनि.प्रवीण मोरे यांनी विशेष तपासशैलीचा वापर करुन आरोपीचा शोध घेतला आणि त्यामध्ये त्यांना यश आले. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेल्या पाचही आरोपींकडून नांदेड, हिंगोली, अंबाजोगाई, बीड, मुंबई, उल्हासनगर आदी भागातील गुन्हे उघडकीस येण्याची दाखल शक्यता आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकtheftचोरीPoliceपोलिस