लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ७३़५५ टक्के अंगणवाड्या या राज्य शासन किंवा ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये भरत असून, शहरी भागात मात्र ९५ टक्के अंगणवाड्या किरायाच्याच इमारतींमध्ये भरत असल्याची गंभीर स्थिती समोर आली आहे़एकात्मिक बालविकास योजना हा केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाअंतर्गत बहुउद्देशीय कार्यक्रम राबविण्यात येतो़ या कार्यक्रमाद्वारे मागास, शहरी, ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात सहा वर्षाहून कमी वय असलेल्या बालकांच्या विकासासाठी व गर्भवती, स्तनदा माता आणि किशोरींसाठी एकत्रित आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात़ या कार्यक्रमात अंगणवाड्यांची महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेता अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत अंगणवाड्यांची शिघ्र पाहणी मोहीम डिसेंबर २०१६ ते जानेवारी २०१७ या कालावधीत घेण्यात आली़ त्यानंतर त्याचा जुलै २०१७ मध्ये अहवाल प्रसिद्ध करण्यात आला़ या अहवालात अंगणवाड्यांना मिळणाऱ्या पायाभूत सुविधा, अंगणवाड्यातील लाभार्थ्यांना देण्यात येणाºया आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, पूरक पोषण आहार, लाभार्थ्यांची संख्या, अंगणवाडी सेविकांच्या समस्या आदी विषयांची माहिती संकलित करण्यात आली़ या अहवालामध्ये अंगणवाड्या कुठे भरतात या विषयीची करण्यात आलेली आकडेवारी शहरी भागासाठी चकीत करणारी ठरली आहे़ ग्रामीण भागात राज्यात राज्य शासन किंवा ग्रामपंचायतीच्या इमारतीत ५९़०६ टक्के अंगणवाड्या भरतात़ परभणी जिल्ह्यात १७१७ पैकी १२६३ म्हणजे ७३़५५ टक्के अंगणवाड्या राज्य शासनाच्या किंवा ग्रामपंचायतीच्या इमारतीत भरतात़शहरी भागाची जिल्ह्याची स्थिती अत्यंत वाईट आहे़ राज्यात ६़३ टक्के अंगणवाड्या नागरी भागात भरत असल्या तरी परभणी जिल्ह्यात १३४ पैकी फक्त ८ अंगणवाड्या शासनाच्या मालकीच्या इमारतीत भरतात़ उर्वरित १२६ अंगणवाड्या किरायाच्या इमारतीमध्येच भरतात़ ग्रामीण भागात मात्र राज्यात १२़६ टक्के तर जिल्ह्यात ३९ म्हणजे २़२७ टक्के अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीमध्ये भरतात़ प्राथमिक शाळांमध्ये राज्यात १०़४ टक्के अंगणवाड्या भरतात़ जिल्ह्यात १८३ म्हणजे १०़६५ टक्के अंगणवाड्या प्राथमिक शाळांमध्ये भरतात़ इतर ठिकाणी राज्यात १२ टक्के अंगणवाड्या भरतात़तर जिल्ह्यात ११५ म्हणजे ७ टक्के अंगणवाड्या इतर ठिकाणी भरत असल्याची बाब या अहवालाद्वारे समोर आली आहे़ ग्रामीण भागातील ९८ टक्के तर शहरी भागातील ९७ टक्के अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी आढळून आले़ ग्रामीण भागात २५ टक्के अंगणवाड्यांमध्ये हातपंपाचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याचे दिसून आले़नागरी भागात ५़६ टक्केच अंगणवाड्यांमध्ये हातपंपाचे पिण्यासाठी पाणी वापरत असल्याचे समोर आले़ ग्रामीण भागातील २ टक्के अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आढळून आले नाहीत़ शहरी भागात मात्र ही स्थिती ३ टक्के आढळून आली़ ग्रामीण भागातील ४२़६ टक्के अंगणवाड्यांमध्ये स्वतंत्र स्वयंपाक घर तर शहरातील फक्त ५़२ टक्के अंगणवाड्यांमध्ये स्वतंत्र स्वयंपाक घर आढळून आले़५४% अंगणवाड्यांमध्ये: शौचालयाची सुविधा४राज्यामध्ये एकीकडे शासनाच्या वतीने स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे़ यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असला तरी शासकीय इमारतींमध्ये मात्र या शौचालयांची गंभीर स्थिती अनेक वेळा आढळून आली आहे़ जेथे शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे़ तेथील बहुतांश शौचालये नियमित स्वच्छता नसल्याने वापराअभावी बंद पडले आहेत़ अशीच स्थिती अंगणवाड्यांमधील आहे़ राज्यातील ग्रामीण भागात फक्त ५३़७ टक्के अंगवाड्यांनाच वापरण्यायोग्य शौचालयांची सुविधा उपलब्ध होती़ उर्वरित ४७़३ टक्के अंगणवाड्यांना शौचालयेच नसल्याची बाब या पाहणी अहवालातून समोर आली़ नागरी भागातही फारसी समाधानकारक स्थिती नव्हती़ नागरी भागातील ५४़१ टक्के अंगणवाड्यांमध्ये वापरायोग्य शौचालय आढळून आले़ उर्वरित ४३़९ टक्के अंगणवाड्यांमध्ये गंभीर स्थिती आढळून आली़
परभणी : ७३ टक्के अंगणवाड्या भरतात इमारतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 11:47 PM