शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

परभणी :खडका बंधाऱ्यातून ४५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 12:11 AM

मराठवाड्यात पर्जन्यमान झालेले नसतानाही जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्याने सोनपेठ तालुक्यातील खडका धरण भरले.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): मराठवाड्यात पर्जन्यमान झालेले नसतानाही जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्याने सोनपेठ तालुक्यातील खडका धरण भरले. या धरणातून २४ आॅगस्ट रोजी सकाळी ८ वाजता एक दरवाजा उघडून ४५०० क्युसेकच्या विसर्गाने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. नदीपात्रात एक ते सव्वा मीटर पूर पातळी राहण्याची शक्यता असल्याने नदीकाठावर असलेल्या तालुक्यातील गावांना तहसील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.सोनपेठ तालुक्यात गोदावरी नदी पात्रात असलेल्या खडका धरणात जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. शनिवारी सकाळी ८ वाजता खडका धरणाच्या एका दरवाजातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी सकाळी धारासूर, मैराळ सावंगी, गौंडगाव, चिंच टाकळी मार्गे ११ वाजेच्या सुमारास महातपुरी परिसरातील गोदावरी नदीपात्रात धडकले. कोरड्याठाक पडलेल्या नदीच्या पात्रात पाण्याचा खळखळ आवाज सुरू झाला. गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाºयात रात्री ८ वाजेपर्यंत व गंगाखेड शहरात रात्री उशिराने पाण्याचे आगमन होणार आहे.गोदावरी नदीपात्रात एक ते सव्वा मिटरपर्यंत पाण्याचा प्रवाह दुथडी भरून वाहण्याचा अंदाज असल्याने पूर नियंत्रण कक्ष सक्रीय झाला आहे. तहसीलदार स्वरुप कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी, मंडळ अधिकारी यांनी गोदावरी नदीकाठावर असलेल्या धारासूर, मैराळ सावंगी, गौंडगाव, चिंचटाकळी, खळी, महातपुरी, दुस्सलगाव, भांबरवाडी, मुळी, धारखेड, झोला, पिंपरी, मसला, नागठाणा आदी गावांसह गंगाखेड शहरातील तारूमोहल्ला, बरकत नगर, संत जनाबाई मंदिर परिसरात आदी भागातील रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान, गंगाखेड तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांसह जनावरांना दोन-दोन कि.मी. पाटपीट करावी लागत आहे. यातच जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. हे पाणी मुळी बंधाºयात साठवून ग्रामस्थांची तहान भागेल, अशी अपेक्षा होती; परंतु, पाटबंधारे विभागाने भविष्यातील पाणीप्रश्न विचारात न घेता आपल्या उदासिनतेचे प्रदर्शन दाखविले. त्यामुळे जायकवाडीतून गोदावरी नदीपात्रात दाखल झालेले पाणी सरळ पुढे निघून जाणार आहे.२ दलघमी पाणीसाठासोनपेठ तालुक्यातील खडका धरणातून गोदावरी नदीपात्रात शनिवारी सकाळी सोडण्यात आलेले पाणी १० तासानंतर मुळी निम्न पातळी बंधाºयात दाखल होईल. या बंधाºयात २.२५ दलघमी पाणी साठवण झाल्यानंतर दरवाजे नसल्याने आलेले पाणी पुढे वाहूून जाऊन रात्री उशिराने गंगाखेड शहरात दाखल होईल. खडका धरणात पाण्याची आवक सुरु राहिल्यास शुक्रवारी सोडण्यात आलेल्या पाण्यात २५ आॅगस्ट रोजी १ हजार क्युसेकने वाढ केल्या जाईल, अशी माहिती मासोळी प्रकल्पाचे शाखाधिकारी रामेश्वर उबाळे यांनी ‘लोकमतशी’ बोलताना दिली.‘मुळी बंधाºयात पाणी आडवा’सोनपेठ तालुक्यातील खडका धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडल्याने शनिवारी सकाळी ११ वाजेपासून गंगाखेड तालुक्यातील नदीपात्रात पाण्याची खळखळ सुरू झाली आहे. गंगाखेड तालुक्यातील मुळी निम्न पातळी बंधाºयाला दरवाजेच नसल्याने नदीपात्रात आलेले पाणी तसेच पुढे वाहून जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील आगामी पिण्याच्या पाण्याची उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता मुळी बंधाºयात पाटबंधारे विभागाने तात्पुरता उपाययोजना आखावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणWaterपाणीRainपाऊस