शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

परभणी: ६० हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:07 AM

२०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीत सापडून बाधित झालेले ६० हजारा पेक्षा अधिक कोरडवाहू व बागायतदार शेतकरी दुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. महसूल प्रशासनाने ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपयांची मागणी केली आहे. दुष्काळी अनुदान तात्काळ मिळाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): २०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीत सापडून बाधित झालेले ६० हजारा पेक्षा अधिक कोरडवाहू व बागायतदार शेतकरीदुष्काळी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. महसूल प्रशासनाने ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपयांची मागणी केली आहे. दुष्काळी अनुदान तात्काळ मिळाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे.गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, राणीसावरगाव व गंगाखेड या चारही महसुल मंडळात गेल्यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाला. या भागातील शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले होते. राज्य शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान अद्यापपर्यंत शेतकºयांना मिळाले नाही. त्यातच चालू वर्षातही पावसाने पाठ फिरविल्याने येथील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. दुष्काळ घोषित झालेल्या महसुली मंडळातील शेतकºयांना तातडीने दुष्काळी अनुदान उपलब्ध व्हावे, यासाठी तहसील प्रशासनाने तालुक्यातील चार ही मंडळातील २ हेक्टर व त्यापेक्षा अधिक शेतजमीन असलेल्या कोरडवाहू तसेच बागायतदार शेतकºयांची स्वतंत्र यादी तयार केली. त्यानंतर या यादीनुसार तालुक्यातील कोरडवाहू ५९ हजार २५० व बागायतदार ८४३ अशा एकूण ६० हजार ९३ शेतकºयांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहे. यामध्ये गंगाखेड महसूल मंडळातील २ हेक्टर कोरडवाहू शेतजमीन असलेले १० हजार २२७ व २ हेक्टरपेक्षा अधिक; परंतु, कोरडवाहू शेतजमीन असलेले १ हजार ३८३ असे ११ हजार ६१० शेतकरी, माखणी महसूल मंडळातील १६ हजार ८८३ शेतकरी, महातपुरी मंडळातील १२ हजार ८५५ शेतकरी व राणीसावरगाव मंडळातील १७ हजार ९०२ शेतकरी असे एकुण ५९ हजार २५० नुकसान झालेल्या शेतकºयांचा समावेश आहे. तर याच ४ महसूल मंडळातील बागायतदार शेतकºयांची यादीही दुष्काळी अनुदानासाठी पाठविण्यात आली आहे. कोरडवाहू शेतजमीन असलेल्या शेतकºयांना ३९ कोटी ५९ लाख ३९ हजार २७५ रुपये व बागायतदार शेतकºयांना १ कोटी १२ लाख ४७ हजार ४८० रुपये असे एकूण ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपये दुष्काळी अनुदान मिळण्याची प्रतिक्षा आहे. गतवर्षीचे दुष्काळी अनुदान तातडीने शेतकºयांना मिळाल्यास आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.शेतकºयांची परिस्थिती झाली बिकट४गंगाखेड तालुक्यातील महातपुरी, माखणी, राणीसावरगाव व गंगाखेड या चारही महसुल मंडळात गेल्यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाला. या भागातील शेतकºयांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले होते. राज्य शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान तत्काळ मिळेला, या अपेक्षेवर तालुक्यातील चार महसूल मंडळातील ६० हजार शेतकरी होते.४तालुक्यातील कोरडवाहू ५९ हजार २५० व बागायतदार ८४३ अशा एकूण ६० हजार ९३ शेतकºयांची यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहे. यासाठी महसूल प्रशासनाने ४० कोटी ७१ लाख ८६ हजार ७५५ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. मागणी करुन जवळपास वर्षभराचा कालावधी उलटला आहे; परंतु, अनुदानाची मागणी केलेल्या प्रस्तावावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही.४गेल्या काही वर्षापासून पाऊसकाळ कमी होत आहे. चालू वर्षात तर पावसाळा सुरू होऊन २ महिने संपत आले, तरीही वार्षिक सरासरीनुसार केवळ २० टक्के एवढाच पाऊस झाला आहे. काळेकुट ढग जमा होऊनही पाऊस पडत नाही. खरीप हंगामात केलेली पहिली पेरणी वाया गेल्यानंतर बहुतांश शेतकºयांना दुबार पेरणी केल्यानंतर आलेले पिकही पावसाअभावी हातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.४पाऊसकाळ नसल्याने अल्पभूधारक शेतकºयांच्या हाताला काम मिळत नसल्याने बहुतांश शेतकºयांनी कामाच्या शोधात गाव सोडून शहर गाठल्याचे दिसत आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना बळ देण्यासाठी शासनाने वेळीच मदत करणे आवश्यक असल्याचे बोलल्या जात आहे.त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.असे आहेत बागायतदार शेतकरी४गंगाखेड महसूल मंडळातील २ हेक्टर बागायती शेतजमीनचे ११७ व २ हेक्टरपेक्षा अधिक बागायती शेतजमीनचे ६७ असे १८४ शेतकरी, माखणी महसूल मंडळातील २१६ शेतकरी, महातपुरी मंडळातील २०१ शेतकरी व राणीसावरगाव मंडळातील २०२ शेतकरी असे एकूण ८४३ नुकसान झालेले शेतकरी आहेत.४या शेतकºयांसाठी लागणाºया अनुदानाची रक्कम जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आली आहे. ही रक्कम मिळताच या शेतकºयांना दुष्काळी अनुदान वाटप होणार आहे. अनुदान वाटप होत असल्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.गंगाखेड तालुक्यातील शेतकºयांची गाव, मंडळ निहाय यादी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आली आहे. लवकरच दुष्काळी अनुदान मिळेल. हे अनुदान प्राप्त होताच तातडीने शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याची व्यवस्था करण्यात येईल.-स्वरुप कंकाळ,तहसीलदार, गंगाखेडमागील काही वर्षापासून तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत सापडलेल्या गंगाखेड तालुक्यातील शेतकºयांना २०१८ च्या खरीप हंगामातील दुष्काळी अनुदानाचे तात्काळ वाटप करण्यात यावे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांची भेट घेऊन दुष्काळी अनुदान तात्काळ वाटप करण्यात यावे, अशी मागणी करणार करणार आहे.-आ. डॉ. मधुसूदन केंद्रे, गंगाखेडनिसर्गाच्या अवकृपेमुळे वेळवर पाऊस पडत नसल्याने शेतात कोणत्याच प्रकारची पिके व्यवस्थित येत नाही. थोड्याफार प्रमाणात आलेली पिके पाण्याअभावी हातून जात आहेत. बाजारात शेतीमालास योग्य किंमत मिळत नाही. यामुळे तालुक्यातील शेतकºयांची अवस्था वाईट आहे. चालू वर्षातील खरीप हंगामातील पेरणी केल्यानंतर पिकांना तारणारा, असा मोठा पाऊस झाला नसल्याने अनेक शेतकºयांनी उधार बी बियाणे घेऊन दुबार पेरणी केली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ दुष्काळी अनुदानाचे वाटप करून आधार द्यावा,-रमेशराव पवार, शेतकरी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ