लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत शाळा बांधकामासाठी मंजूर केलेल्या रकमेपैकी १३ शाळांमध्ये बांधकामे रखडली असून, ३२ लाख २३ हजार ८८ रुपयांचा अपहार झाल्या प्रकरणी संबंधित शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामशिक्षण समितीच्या अध्यक्ष, सचिवांकडून ही रक्कम वसूल करावी व गुन्हे दाखल करावेत, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत़सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळांच्या दुरुस्तीसाठी २००८-०९, २००९-१०, २०१०-११, २०११-१२ या काळात निधी उपलब्ध करून दिला होता़ परंतु, ही कामे अजूनही अपूर्ण आहेत़ या नोटिसीनुसार परभणी तालुक्यातील उखळद जिल्हा परिषद शाळेला ३ लाख १० हजार रुपयांची रक्कम मंजूर झाली होती़ त्यापैकी १ लाख २२ हजार ८४ रुपये संबंधिताकडून वसूल होण अपेक्षित आहे़ शाळेचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.परभणी शहरामध्ये महापालिकेंतर्गत पाच शाळांसाठी सर्व शिक्षा अभियानातील निधी मंजूर झाला होता़ परंतु, या शाळांची बांधकामे रखडली आहेत़ त्यात महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळा क्रमांक ४, प्राथमिक शाळा आंबिकानगर, प्राथमिक शाळा खानापूर, प्राथमिक शाळा परसावतनगर, मनपा प्रा़शा़ जिजामाता या शाळांचा समावेश आहे़ प्राथमिक शाळा क्रमांक ४ मध्ये ३ लाख ४ हजार ६२५ रुपये, अंबिकानगर शाळेत १ लाख ४० हजार ८३४ रुपये, खानापूरनगर शाळेत १ लाख ३७ हजार ७२५ रुपये आणि परसावतनगर शाळेमध्ये ३ लाख १९ हजार १९९ रुपयांचा तर मनपा प्रा़शा़ जिजामाता शाळेत ५ लाख २२ हजार ६१० रुपयांचा अपहार झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी म्हटले असून, ही रक्कम संबंधितांकडून वसूल करावी, असे आदेश दिले आहेत़त्याचप्रमाणे वझूर जि़प़ शाळेमध्ये ११ हजार ५०० रुपये, गंगाखेड तालुक्यातील खळी जि़प़ शाळेत २ लाख ३६ हजार ६३६, गंगाखेड प्राथमिक शाळेत ४ लाख ५८ हजार, कर्लेवाडी जि़प़ शाळेत १ लाख ९६ हजार, इसाद जि़प़ शाळेत २ लाख ५६ हजार ५००, शेंडगा जि़प़ प्राथमिक शाळेत २ लाख २५ हजार, कुंडेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत २ लाख ५६ हजार ५०० तर भाऊचा तांडा जि़प़ शाळेत ३५ हजार ८७५ रुपयांचा अपहार झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी निदर्शनास आणून दिले असून, या शाळांच्या शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष, सचिवांकडून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाºयांना दिले आहेत़
परभणी : शाळा बांधकामात ३२ लाखांचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 12:57 AM