मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अवर्षण परिस्थितीत वन्य प्राण्यांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी येथील वन विभागाने जिल्ह्यातील जंगल भागात २० पाणवठे उभारले आहेत.जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. उन्हाळ्यात पाण्याच्या शोधार्थ वन्य प्राण्यांचे स्थलांतर होण्याची शक्यता असते. दरवर्षी बौद्ध पौर्णिमेच्या रात्री पशुगणना होते. ही गणना केवळ जंगल भागातीलच असते. गतवर्षी जंगल भागात ३७६ पशू आढळले होते. त्यात हरीण, काळवीट, मोर, लांडोर, तरस, नीलगाय, उदमांजर, रानडुक्कर, वानर इ. प्राण्यांचा समावेश होता. पशुगणनेत उपलब्ध झालेल्या प्राण्यांच्या संख्येनुसार वनविभाने दुष्काळात जंगलामध्ये २० पाणवठे तयार केले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांची भटकंती थांबली आहे.परभणी जिल्ह्यातील पशूगणनेत आढळलेल्या पशूंची संख्या (जंगलातील)बिबट्या 1कोल्हा 15हरीण 127नीलगाय 200काळवीट 200वानर 500मोर 9१२ गावांच्या शिवारात वन्यक्षेत्रपरभणी जिल्ह्यात जिंतूर बिटातील केहाळ, सावळी, डिग्रस, इटोली, मोहखेड, टाकळखोपा, आरखेड, मानकेश्वर, सावरगाव, सावळी, चौधरणी, धारखेड आदी ठिकाणी जंगल क्षेत्र आहे. या भागात गायरान जमिनीवर पशुप्राण्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी २० कृत्रिम पानवठे तयार केले आहेत. त्यामुळे दुष्काळातही वन्य प्राण्यांच्या पाण्याची सुविधा झाली आहे. या पाणवठ्यांची वनविभाकडून दररोज पाहणी केली जाते, अशी माहिती वनविभागीय अधिकारी विजय सातपुते यांनी दिली.
परभणी : ३७६ वन्य प्राण्यांसाठी २० पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:20 AM