लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): गतवर्षी कापसावर पडलेल्या बोंडअळीच्या नुकसानीपोटी शासनाने अनुदान जाहीर केले होते. मात्र तालुक्यातील १३ गावांतील शेतकऱ्यांना मिळणारे ४ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान अद्यापही बँक खात्यावर जमा झाले नसल्याने शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.गतवर्षी पाथरी तालुक्यासह जिल्हाभरात कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. परिणामी शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. शेतकºयांना दिलासा म्हणून राज्य शासनाने ६ हजार ५०० रुपयांचे अनुदान २ हेक्टर मर्यादेपर्यंत जाहीर केले.यात तालुक्यातील ५६ गावांसाठी १५ कोटी अनुदान अपेक्षित होते. दोन टप्प्यात शासनाकडून अनुदान उपलब्ध झाले;परंतु, तिसºया टप्प्यातील शेतकºयांना अद्यापही हे अनुदान मिळालेले नाही.यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.कापूस व सोयाबीन या नगदी पिकाला मोठा फटका बसला आहे. सणासुदीचे दिवस असल्याने शासनाने जाहीर केलेले बोंडअळीचे अनुदान बँक खात्यावर वर्ग करावे, अशी मागणी शेतकºयांकडून केली जात आहे.दोन टप्प्यात १० कोटी ५० लाखांचे वाटपराज्य शासनाने बोंड अळीचे दोन टप्प्यात अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. पहिल्या टप्प्यात १६ गावांतील शेतकºयांना १० मे २०१८ रोजी ४ कोटी २२ लाख २९ हजार २२७ रुपये वाटप करण्यात आले. तर दुसºया टप्प्यातील २७ गावांतील शेतकºयांना १६ जुलै रोजी ६ कोटी ३३ लाख ५९ हजार ८०० रुपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेली गावेपाथरी तालुक्यातील १३ गावांतील १० हजार ८५५ शेतकºयांचे ४ कोटी ३० लाख ३३ हजार ३०५ रुपये अनुदान येणे बाकी आहे. यात विटा (८६७), वडी (८६६), वरखेड (८४७), तुरा (६९७), मंजरथ (५७२), नाथरा (६४२), जवळा झुटा (८५८), सारोळा (३९७), उमरा (७९७), झरी (७८०), वाघाळा (१२२४), रेणाखळी (१५६०) आणि टाकळगव्हाण येथील ५७८ शेतकºयांचा समावेश आहे.गतवर्षी कापसावर पडलेल्या बोंडअळीने शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर यावर्षी पाऊस नसल्याने दुष्काळाचे संकट ओढावले आहे. सतत येणाºया नैैसर्गिक संकटाने शेतकरी पूर्णपणे जेरीस आला आहे.- सुभाष कोल्हे, माजी जि.प.सदस्य
परभणी : बोंडअळीचे ४ कोटी थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:40 AM