लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विधानसभा निवडणुकीमध्ये चारही मतदारसंघामध्ये तब्बल ५० अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या लढतींमध्ये अडचणीचे ठरणारे आणि विजयात अडसर निर्माण करणाऱ्या अपक्षांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी आता मनधरणी सुरु झाली आहे. सोमवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असून किती अपक्ष उमेदवार माघार घेतात, याकडे लक्ष लागले आहे.परभणी जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ असून चारही मतदारसंघात ८१ उमेदवारांचे १०९ नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत. विशेष म्हणजे, त्यात ५० उमेदवार हे अपक्ष आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघात एकूण २७ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामध्ये शिवसेना- भाजप महायुती, काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित आघाडी, बहुजन महापार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, एमआयएम, प्रहार जनशक्ती पक्ष या राजकीय पक्षांच्या उमेदवारांबरोबरच १८ अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. पाथरी विधानसभा मतदारसंघात भाजप- शिवेसना महायुती, बहुजन समाज पार्टी, काँग्रेस, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी, बहुजन मुक्ती पार्टी, वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या उमेदवारांबरोबरच ८ अपक्ष उमेदवारांचे अर्ज आले आहेत. या मतदारसंघात एकूण १४ उमेदवार आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघात २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप महायुती, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, बहुजन महा पार्टी, संभाजी ब्रिगेड, वंचित बहुजन आघाडी, आंबेडकर नॅशनल काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांबरोबरच ९ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. गंगाखेड मतदारसंघात २३ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महायुती, बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी या पक्षांबरोबरच अपक्षांचे १५ अर्ज दाखल झाले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा आता संपला आहे. दुसºया टप्प्यामध्ये अर्ज माघारी घेतले जातात. सोमवार हा एकच दिवस अर्ज मागे घेण्यासाठी हातात असल्याने रविवारी जिल्ह्यातील चारही मतदारसंघात अपक्ष उमेदवारांच्या ताकदीसंदर्भात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी विचारविनिमय सुरु केला आहे. दखलपात्र उमेदवारांशी संपर्क साधून त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, निवडणुकीमध्ये आपल्या बाजुने लढत सोयीची व्हावी, या उद्देशाने दिवसभर अपक्ष उमदेवारांची मनधरणी करण्यात आली.प्रशासनाचेही लागले लक्ष४उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या चित्रावरुन पाथरी मतदारसंघ वगळता इतर तीनही मतदारसंघात १७ पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.४ही निवडणूक प्रक्रिया राबविताना इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर केला जातो. या मशीनच्या एका बॅलेट युनिटवर नोटाचे बटन धरुन १७ उमेदवारांची नावे बसू शकतात.४सध्याची उमेदवारांची यादी पाहता केवळ पाथरी मतदारसंघात एक बॅलेट युनिट लागणार हे निश्चित झाले आहे; परंतु, परभणी, जिंतूर आणि गंगाखेड या तीन मतदारसंघात सध्या दाखल उमेदवारी अर्जांवरुन दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागेल, असे दिसते.४उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीनही मतदारसंघात १६ उमेदवार निवडणूक लढतीत राहिले तर प्रशासनाला एकाच मतदान यंत्राचा वापर करणे शक्य होणार आहे. त्यामुळे तीन मतदारसंघातील किती उमेदवार अर्ज मागे घेतात, याकडे प्रशासनाचेही लक्ष लागले आहे.आज होणार लढतींचे चित्र स्पष्ट४अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांकडे सोमवार हा एकमेव दिवस शिल्लक आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर मात्र निवडणूक लढविणाºया अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे सोमवारीच विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्रही स्पष्ट होणार आहे.४अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी रविवारी रात्रीतूनच प्रयत्न करण्यात आले. अपक्ष उमेदवारांचे जवळचे कार्यकर्ते, नातेवाईक यांचा शोध घेऊन त्यांच्या मार्फत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून आले.
परभणी : चार मतदारसंघांत ५० अपक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 12:31 AM