लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिकच्या ९ व माध्यमिकच्या ४ अशा १३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आले असून, ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२़३० वाजता शहरातील पाथरी रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे़जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षकांना दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत असतात़ या अनुषंगाने जि़प़च्या शिक्षण सभापती तथा उपाध्यक्षा भावनाताई नखाते आणि शिक्षणाधिकारी डॉ़ वंदना वाव्हूळ यांनी मंगळवारी या पुरस्कारांची घोषणा केली़ त्यामध्ये प्राथमिक शिक्षक संवर्गातून विलास एकनाथ कुरवाडे (जि़प़ शाळा पिंगळी, ता परभणी), लक्ष्मण हनुमंत गिते (जि़प़ शाळा आहेरवाडी, ता़ पूर्णा), अनंतकुमार कुशेबा देवळे (जि़प़ शाळा धानोरा बु़, ता़ जिंतूर), धनंजय अंगद कोल्हे (जि़प़ शाळा नरळद, ता़ गंगाखेड), मनीषा दगडू कासले (जि़प़ शाळा पुयणी, ता़ पालम), अवधूत काशीगीर गिरी (जि़प़ शाळा पोहंडूळ, ता़ सोनपेठ), ताराचंद हिरामण चव्हाण (जि़प़ शाळा, डिग्रस, ता़ सेलू), नुसरत फातेमा इलियास (जि़प़ शाळा शाखा क्रमांक १, मानवत), शेख मुफस्सीर मो़ अब्दुल रहेमान (जि़प़ शाळा इंदिरानगर, ता़ पाथरी) या ९ शिक्षकांना तर माध्यमिकमधून रामराव नारायण पुणे (जि़प़ शाळा राणीसावरगाव, ता़ गंगाखेड), सुनीलकुमार सत्यनारायण तोष्णीवाल (जि़प़ शाळा कोल्हा, ता़ मानवत), हरिहर सखाराम खिरे (जि़प़ शाळा देऊळगाव गात, ता़ सेलू), नारायण बाबाराव शिंदे (जि़प़ प्रशाला शेळगाव, ता़ सोनपेठ) या ४ अशा एकूण १३ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे़५ सप्टेंबर रोजी दुपारी १२़३० वाजता शहरातील रेणुका मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे़ या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची तर अध्यक्षस्थानी जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड आणि व्यासपीठावर उपाध्यक्षा भावनाताई नखाते, बांधकाम सभापती अशोक काकडे, कृषी सभापती श्रीनिवास मुंडे, समाजकल्याण सभापती उर्मिलाताई बनसोडे, महिला व बालकल्याण सभापती राधाताई सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, डॉ़ कैलास घोडके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुहास विसपुते, डाएटचे प्राचार्य अनिल गौतम आदींची उपस्थिती राहणार आहे़ या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण सभापती भावनाताई नखाते व शिक्षणाधिकारी डॉ़ वंदना वाव्हूळ यांनी केले आहे़त्र्यंबक वडसकर, सिद्धार्थ मस्के यांना राज्यस्तरीय पुरस्कार४राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागानेही राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे़ त्यामध्ये प्राथमिक शिक्षक गटातून पूर्णा तालुक्यातील फुलकळस येथील जि़प़ केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक सिद्धार्थ विठ्ठलराव मस्के यांना तर माध्यमिकमधून परभणी तालुक्यातील पोखर्णी येथील नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक त्र्यंबक पंडितराव वडसकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे़४५ सप्टेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण मुंबई येथील रंग शारदा मंदिर येथील सभागृहात करण्यात येणार आहे़ यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री अॅड़ आशिष शेलार यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़
परभणी : १३ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 11:32 PM