लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यातील सात मंडळात झालेल्या अल्प पावसामुळे ४५ हजार हेक्टरवरील कापसाचे पीक धोक्यात आले आहे. एकाच वेचणीनंतर कापसाचा पाला होत असल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.जून महिन्यात मृगनक्षत्राच्या मुहूर्तावर झालेल्या समाधानकारक पावसावर परभणी तालुक्यात खरीप हंगामामध्ये १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. गतवर्षीच्या खरीप हंगामात बोंडअळीच्या प्रादूर्भावामुळे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाकडे यावर्षीच्या हंगामात तालुक्यातील बहुतांश शेतकºयांनी पाठ फिरविली. १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रापैकी ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस तर ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. कापूस लागवडीनंतर २० आॅगस्टपर्यंत झालेल्या कमी-अधिक पावसामुळे शेतकºयांचे कापूस पीक चांगले बहरले. जास्तीचे उत्पन्न व पीक निरोगी रहावे, यासाठी शेतकºयांनी औषधी व खतांवर हजारो रुपयांचा खर्च केला; परंतु, तालुक्यात २१ आॅगस्टनंतर पाऊस झाला नाही. ४० दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर परतीचा पाऊस तालुक्यात चांगला बरसेल, अशी अपेक्षा शेतकºयांना होती; परंतु, परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. त्यामुळे जमीन भेगाळली. परिणामी ३२ हजार हेक्टवरील कापूस पीक करपत आहे.जे काही पीक शेतकºयांच्या हाती लागले आहे. त्या कापसाची एका वेचणीनंतर अवस्था बिकट होत आहे. त्यामुळे या पिकाला सध्या पावसाची नितांत गरज आहे.दोन मंडळाची : अवस्था बिकटपरभणी तालुक्यात सात मंडळांचा समावेश आहे. यामध्ये दैठणा, पिंगळी, जांब, पेडगाव, झरी, परभणी (ग्रामीण व शहर) व सिंगणापूर या मंडळांचा समावेश आहे.जांब व पेडगाव या मंडळातील पिकांची अवस्था इतर मंडळांपेक्षा खूपच बिकट आहे. सध्या सोयाबीनची काढणी सुरू आहे. सोयाबीनचा उतारा इतर पाच मंडळांपैकी या दोन मंडळात खूपच कमी येत असल्याची माहिती कृषी कार्यालयाकडून देण्यात आली.
परभणी : ४५ हजार हेक्टरवरील कापूस पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:13 AM