लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : शहरातील नगरपालिकेकडे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे १७०० प्रस्ताव प्राप्त झाले होते. पहिल्या टप्प्यात त्यापैकी ४५६ घरकूले मंजूर झाली असून उर्वरित घरकूले दुसऱ्या आणि तिसºया टप्प्यात मंजूर होणार आसल्याची माहिती पालिकेने दिली. दरम्यान, मंजूर झालेल्या घरकुलांना शासकीय दरात वाळू उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.प्रधानमंत्री आवास योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली महत्वकांक्षी योजना आहे. प्रत्येक गरिबाला हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने योजनेची आखणी करण्यात आली आहे. दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांबरोबरच अल्प उत्पन्न गटातील लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी शासनाच्या वतीने अनुदान दिले जाते. ४ टप्यापर्यंत अनुदान लाभार्थ्याला दिले जाते.या अनुदानातूून शौचालयासह घरकुलाचे बांधकाम करणे अपेक्षित आहे. या योजनेंतर्गत पालिकेने शहरातील नागरिकांकडून मार्च-एप्रिल २०१८ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली होती. नागरिकांनी याला प्रतिसाद देत १७०० अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची पालिका प्रशासनाच्या वतीने छाननी करण्यात आली. या नंतर सर्वेक्षण करून ८ आॅक्टोबर २०१८ ला नगरपालिकेने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई यांच्याकडे ४५६ प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले होते. या घरकुलांना मंजुरी मिळाली असून लवकरच संबंधित लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांकडून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.ही योजना २०२२ पर्यंत अविरत चालणार असल्याने दुसºया आणि तिसºया टप्यात उर्वरित घरकुलांच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव महाराष्टÑ गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मुंबई यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेने दिली. दरम्यान, घरकूल मंजूर झालेल्या लाभार्र्थ्यांना बांधकाम करण्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी ११ डिसेंबर रोजी नगरपालिकेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.‘शासकीय दरात वाळू उपलब्ध करून द्या’४पालिकेने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात ४५६ घरकूल मंजूर केले असले तरी लाभार्थ्यांना प्रत्यक्ष बांधकाम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.४सद्य स्थितीत वाळुचे लिलाव झाले नसल्याने कृत्रिम टंचाई निर्माण करून काही जण आवाच्या सव्वा दराने वाळू विक्री करीत आहेत. लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध न झाल्यास बांधकाम लांबू शकते. त्यामुळे लाभार्थ्यांना शासकीय दरात वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्याकडे करणार असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्षा राणी अंकूश लाड यांनी दिली. त्याच बरोबर मानवत शहरातील एकही लाभार्थी घरकुलापासून वंचित राहणार नसल्याचे लाड यांनी सांगितले.पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधकाम प्रक्रिया संदर्भात ११ डिसेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.-उमेश ढाकणे, मुख्याधिकारी नगरपालिका, मानवत
परभणी : ४५६ घरकुलांच्या प्रस्तावांना दिली मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:47 AM