लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : विविध गुन्ह्यांमध्ये फरार ५ आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांना संबंधित पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.जिंतूर शहरातील आरोपी हलीम खॉ ऊर्फ हकीम खॉ अक्रम खॉ पठाण हा गेल्या चार वर्षापासून फरार होता. त्याच्यावर जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत. याबाबतची माहिती मिळताच त्याला २४ आॅक्टोबर रोजी शहरातील गणपती मंदिर बाजार परिसरात सापळा रचून स्थागुशाच्या पथकाने ताब्यात घेतले व जिंतूर पोलीस ठाण्यात हजर केले.सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या आरोपी गोदावरी कुंडलिक भालेराव व गोकर्णाबाई अशोक बोबडे या चार वर्षापासून फरार होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्याची माहिती मिळाली. त्यांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेऊन सेलू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. कुपटा येथील राजू भगवान डंबाळे याच्यावर सेलू पोलीस ठाण्यात ४२० चा गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या तीन वर्षापासून डंबाळे हा फरार होता. स्थागुशाच्या पथकाने त्यास त्याच्या शेतशिवारातून ताब्यात घेतले व सेलू पोलिसांच्या स्वाधीन केले. सेलू शहरातील बागवान गल्ली भागातून आरोपी स.अकबर स.इब्राहीम हा सेलू पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांतर्गत तीन वर्षांपासून फरार होता. स्थागुशाच्या पथकाने त्याला सेलू येथून ताब्यात घेतले व स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, मधुकर पवार, सुग्रीव केंद्रे, शाम काळे आदींनी केली.
परभणी : ५ फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:35 AM