शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

परभणी : शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कासाठी ५ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:33 AM

जिल्हा परिषद शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची फीस भरता यावी, यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्याचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत बुधवारी मंजूर करण्यात आला, अशी माहिती जि.प. उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाताई नखाते यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषद शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची फीस भरता यावी, यासाठी ५ लाख रुपयांची तरतूद करण्याचा ठराव शिक्षण समितीच्या बैठकीत बुधवारी मंजूर करण्यात आला, अशी माहिती जि.प. उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती भावनाताई नखाते यांनी दिली.येथील जि.प.च्या दालनात २७ फेब्रुवारी रोजी जि.प. उपाध्यक्षा भावनाताई नखाते यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण समितीची बैठक घेण्यात आली.या बैठकीस समिती सदस्य गंगुबाई नागेश्वर, सुषमाताई देशमुख, पार्वतीताई वाघमारे, विशाखा सोळंके, प्रणिता राठोड, उमाताई वाकनकर, नारायण जाधव, राधेश्याम वाढवे, सदस्य सचिव प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड यांची उस्थिती होती.या बैठकीत जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता आठवीमधील विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील शिष्यवृत्ती परीक्षेच्या फीससाठी ५ लाख रुपयांंची तरतूद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रती वर्ष १२ हजार रुपये याप्रमाणे बारावीपर्यंत शिक्षण घेताना चार वर्षात ४८ हजार रुपये शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न तत्काळ निकाली काढण्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. तसेच २००६ पासून चटोपाध्याय वेतनश्रेणीचा लाभ न मिळालेल्या शिक्षकांना तो लाभ देण्याबाबत शिक्षणाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करावी, असा ठराव घेण्यात आला.आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षकांना मिळणारी वेतनवाढीच्या न्यायप्रविष्ठ प्रकरणाबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच राज्य व राष्टÑीय पातळीवरील क्रीडा क्षेत्रातील सहभागी खेळाडूंसाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून ५ लाख रुपये तरतुदीचाही ठराव घेण्यात आला. दहावी, बारावी परीक्षा नियोजन, गुणवत्ता, अध्ययन स्तर निश्चिती, शालेय पोषण आहार तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रलंबित प्रश्नांवर या समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती शिक्षण सभापती भावनाताई नखाते यांनी दिली.आता तालुकास्तरावरही आदर्श शाळा पुरस्कार४जिल्हा परिषद शाळेतील अध्ययन स्तर निश्चितीमध्ये तालुक्यातील प्रथम येणाऱ्या शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड केली जाणार आहे. त्याचबरोबर त्या शाळेला स्मार्ट टीव्ही देऊन पुरस्काराने सन्मानित केले जाणार असा ठरावही या बैठकीत घेण्यात आला. हा निर्णया अध्ययन स्तर निश्चितीमध्ये सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.४यावर्षी परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूरांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर परिषद शाळेत शिकणाºया आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा फीस जिल्हा परिषदेच्या वतीने भरण्यात येणार असल्याने हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे.४शिष्यवृत्ती परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या, परंतु, परिस्थितीमुळे परीक्षा फीस भरू न शकणाºया विद्यार्थ्यांना शिक्षण विभागाच्या या निर्णयाने मोठा दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाexamपरीक्षा