लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पाच ठिकाणी शासकीय दुध योजनेमार्फत दूध विक्री केंद्र उभारण्यात येणार आहेत.ईदच्या दिवशी दुधाला मागणी वाढते. तेव्हा दुधाचा योग्य प्रमाणात पुरवठा व्हावा, याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्या अंतर्गत शासकीय दूध डेअरीच्या वतीने पाच ठिकाणी दूध विक्री केंद्र उभारण्यात येत आहेत.शाही मशीद, अपना कॉर्नर, गोरक्षण जवळील काला बावर, गंगाखेड नाक्यावरील साखला प्लॉट आणि मध्यवर्ती दुग्ध शाळा परभणी या ठिकाणी ३६ रुपये प्रति लिटर या दराने दूध वितरण केले जाणार आहे.ईदगाह मैदान नमाजसाठी सज्जपरभणी- रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील इदगाह मैदानाची महापालिकेच्या वतीने गुरुवारी स्वच्छता करण्यात आली. मैदान परिसरात रोड रोलरच्या सहाय्याने दबई करुन नमाजसाठी मैदानाची आखणीही करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी पाणी, वीज व इतर अत्यावश्यक सेवा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. गुरुवारी सकाळी महापौर मीनाताई वरपूडकर व उपमहापौर माजूलाला यांनी इदगाह मैदानाची पाहणी केली. तसेच शहरातील साखला प्लॉट, धाररोड या ठिकाणच्या मैदानांचीही पाहणी करण्यात आली. त्यानंतर महापौर व उपमहापौरांनी मनपा अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. शनिवारी जिल्हाभरात ईद साजरी केली जात असून परभणी शहरातील जिंतूररोडवरील इदगाह मैदानावर मुख्य नमाज अदा केली जाते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
परभणी : पाच ठिकाणी दूधविक्री केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:19 AM