शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

परभणी : संपामुळे ५०० कोटींचे व्यवहार झाले ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:19 AM

राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप पुकारल्याने दिवसभरातील कामकाजाचा सुमारे ५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप पुकारल्याने दिवसभरातील कामकाजाचा सुमारे ५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले़परभणी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांमधून दररोज लाखो रुपयांचा व्यवहार होतो़ बँक शाखा सुरू होण्यापूर्वीच ग्राहकांची शाखेच्या समोर रांग लागते़ त्यामुळे बँकींग व्यवहारावरच जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल अवलंबून आहे़ बुधवारी बँकींग क्षेत्रात काम करणाºया अधिकारी, कर्मचाºयांच्या युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता़ या संपामध्ये युएफबीयू या संघटनेच्या बॅनरखाली बँकींग क्षेत्रातील इतर ९ संघटनाही संपात सहभागी झाल्या होत्या़परभणी जिल्ह्यामध्ये विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या सुमारे ५६ शाखा आहेत. या सर्व शाखा बुधवारी बंद राहिल्या. बँकींग व्यवहारही पूर्णत: ठप्प झाले होते़ राष्ट्रीयकृत बॅकांच्या संपामुळे इतर आॅनलाईन व्यवहारावरही परिणाम झाला़ एनईएफटी, आरटीजीएस, धनादेशाद्वारे होणारे व्यवहार दिवसभरात ठप्प राहिले़ सर्वसाधारणपणे राष्ट्रीयकृत बँकांमधून दिवसाकाठी ५०० कोटी रुपयांचा व्यवहार होतो़ हा व्यवहार बुधवारी बंद राहिल्याचे पहावयास मिळाले़पाचव्या दिवशीही कामकाज ठप्प४जिल्ह्यात पाचव्या दिवशी बँकांचे कामकाज ठप्प राहिले़ २१ डिसेंबर रोजी राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी, कर्मचाºयांनी संप पुकारला होता़ २२ डिसेंबर रोजी चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहिल्या़ त्यानंतर २३ डिसेंबर रोजी रविवार, २४ डिसेंबर रोजीचा एक दिवस वगळता २५ रोजी नाताळची सुटी आणि २६ डिसेंबर रोजी पुन्हा संप झाल्याने ५ दिवस बँकींग कामकाज ठप्प राहिले़ विशेष म्हणजे, बुधवारी राष्ट्रीयकृत बँका वगळता इतर नागरी व सहकारी बँका सुरू असल्या तरी या बॅँकांचे व्यवहारही राष्ट्रीयकृत बँकेवर अवलंबून असल्याने नागरी, सहकारी बँकांच्या व्यवहारावरही परिणाम झाले़या मागण्यांसाठी पुकारला संप४युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनने बुधवारी संप पुकारला़ फोरमच्या अधिकारी, पदाधिकाºयांनी स्टेट बँक आॅफ इंडिया स्टेडियम शाखेसमोर निदर्शने केली़ यावेळी परभणी शहर व परिसरातील सर्व सरकारी बँकांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते़ बँक आॅफ बडोदा, देना बँक व विजया बँक यांच्या विलनीकरणास विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला़४तसेच कार्पोरेट सेक्टरच्या मोठ्या बुडीत कर्जाची वसुली करा, प्रलंबित असलेला वेतन करार लागू करावा, आदी मागण्या करण्यात आल्या़ यावेळी अधिकारी संघटनेचे डॉ़ सतीश टाके, मेश्राम, कर्मचारी संघटनेचे चंद्रकांत लोखंडे, भास्कर विभुते यांनी मार्गदर्शन केले़४यावेळी अशोक पिल्लेवार, सुशील काकडे, शिवराम शेजूळकर, अशिष देवधर, कुलदीप देसाई यांच्यासह शहरातील राष्टÑीयकृत बँकांतील बहुसंख्य कर्मचारी सहभागी झाले होते़

टॅग्स :parabhaniपरभणीStrikeसंपbankबँकEmployeeकर्मचारी