लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी, बोरी (परभणी): शुक्रवारी झालेल्या वादळी वाºयाने पाथरी आणि जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरात विजेचे अनेक खांब कोसळले असून, बोरी परिसरातील ५२ आणि पाथरी तालुक्यातील १२ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह तालुक्यात मान्सूनपूर्व पाऊस झाला. ४ जून रोजी लिंबा, बाबूलतार या भागात जोराचा पाऊस होऊन मोठे नुकसान झाले. ७ जून रोजी सायंकाळी पुन्हा वादळी वारे आणि पावसाने शहरासह ग्रामीण भागात हजेरी लावली. सोसाट्याचा वारा असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच घरावरील पत्रे उडून गेली. माळवदाच्या घरांच्या भिंती पडल्या. पोहेटाकळी येथील शंकर फड यांच्या शेतातील घरावरील पत्रे वादळी वाºयाने उडून गेली आहेत.बाभळगाव परिसरात वीज वितरण कंपनीच्या ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत ५ विजेचे खांब तुडून पडले. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला आहे. परिणामी बाभळगाव, गुंज, लोणी, अंधापुरी, उमरा, कानसूर, डाकू पिंपरी, मसला ही गावे अंधारात आहेत.७ जून रोजी पुन्हा बाभळगाव परिसरात जोराचा पाऊस झाल्याने या भागातील वीजपुरवठा पुन्हा खंडीत झाला. शहरातील उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील निलगीरीच्या झाडाची फांदी तुटून एक विद्युत खांब व तीन विद्युत खांबांवरील तारा तुटून पडल्या आहेत. विशेष म्हणजे, शहरात थोेडेही वारे वाहिले की वीज गायब होत आहे. परिणामी नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.७ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रामपुरी खुर्द येथील प्रदीप बालासाहेब चव्हाण यांच्या घरावरून मोबाईल टॉवरला वीजपुरवठा करणारी तार घरावरून गेली आहे. ही तार तुटून पत्राच्या शेडचे घर जळून खाक झाले. या घटनेत ३ तोळे सोने, नगदी १२ हजार रुपये, गहू, ज्वारी, खताच्या बॅग, कपडे आणि संसारोपयोगी साहित्य आणि १७ पत्रे जळून खाक झाले असून, सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती प्रदीप चव्हाण यांनी दिली.७ जून रोजी झालेल्या पावसाचा पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठा फटका सहन करावा लागला. वादळी वाºयामुळे पाथरी तालुक्यातील १२ गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला असून, ही गावे अंधारात आहेत.जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरातही वादळी वाºयाने मोठे नुकसान झाले आहे. बोरी ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत विजेचे खांब उन्मळून पडल्याने ४० गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. पहिल्याच मान्सूनपूर्व पावसाने जिंतूर आणि पाथरी तालुक्यातील ५२ गावे अंधारात आहेत. थोडेही वारे वाहू लागल्यास वीजपुरवठा गुल होतो. वादळी वाºयात तर विजेचे खांब कोसळून पडले आहेत. आगामी काळात ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन मान्सूनपूर्व वीज दुरुस्तीची कामे करून घ्यावीत, अशी मागणी तालुक्यातील ग्रामस्थांकडून होत आहे. सध्या दोन्ही तालुक्यात वीज खांबांच्या दुरुस्तीची कामे सुरू असून, लवकरच वीजपुरवठा सुरळीत होईल, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात येत आहे.बोरी परिसरातील ४० गावांचा वीजपुरवठा खंडित४७ जून रोजी वादळी वाºयाने जिंंतूर तालुक्यातील बोरी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत येणाºया ४० गावांमध्ये एल.डी. व एस.डी. लाईनचे दीडशेहून अधिक विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे ४० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बोरी परिसरात ७ जून रोजी सायंकाळी ४ वाजता वादळी वाºयासह पाऊस झाला. या वाºयात चांदज येथील पाणीपुरवठा योजनेचे विद्युत रोहित्र कोसळून मोठे नुकसान झाले.४तसेच कौसडी येथील लिंबाजीराव इखे यांचा २ एकरवरील केळीचा फड उद्ध्वस्त झाला. रमेश मोरे यांच्या दीड एकरवरील केळी पिकांनाही फटका बसला आहे. १६ गाव पाणीपुरवठा योजनेचे विद्युत खांब पडल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. संपूर्ण गाव अंधारात असून, बोरी व कौसडी येथील ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. एकंदरित शुक्रवारी झालेल्या वादळी वाºयाचा बोरी व परिसरातील गावांना फटका बसल्याचेही दिसून येत आहे.आखाड्यावरील दोन गायी दगावल्या४पाथरी तालुक्यातील मसला या गावालाही वादळी वाºयाचा तडाखा बसला आहे. मुकुंदराव चौधरी यांनी दोन गायी शेत आखाड्यावर बांध,ल्या होत्या. वादळी वाºयाने उडून आलेला पत्रा गायींना लागल्याने दोन्ही गायी दगावल्या आहेत. तसेच गावातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली असून, संपूर्ण गावातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. बागायती पिकांचेही नुकसान झाले आहे.मान्सूनपूर्व पाऊस ठरला तापदायक४जिल्ह्यात ७ जून रोजी बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने आगमन केले. मान्सूनपूर्व पाऊस हा शेतकऱ्यांसाठी मदतीचा ठरत असतो; परंतु, शुक्रवारी झालेला पाऊस हा तापदायक ठरल्याचे शनिवारी समोर आले आहे.४पाथरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वीज तारा तुटल्यामुळे १२ गावे अंधारात आहेत. ंिजंतूर तालुक्यातील बोरी येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रांतर्गत विद्युत खांब उन्मळून पडल्याने ४० गावांतील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.४त्यामुळे वीज वितरण कंपनीने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. विशेषत: केळीच्या बागा आडव्या झाल्याने शेतकºयांना नुकसानीला सामोरे जावे लागत असून, आता पंचनाम्याची मागणी होत आहे.
परभणी : वादळी वाऱ्यामुळे ५२ गावे अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:18 AM