शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

परभणी : खरिपाचे ५९ टक्के क्षेत्र पडिक राहण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 11:44 PM

यावर्षीच्या खरीप हंगामात जुलै महिन्याचा पहिला आठवडा ओलांडला तरीही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने सुमारे ५९ टक्के खरिपाचे क्षेत्र पेरणीअभावी पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़ सध्या जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असून, मोठ्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात जुलै महिन्याचा पहिला आठवडा ओलांडला तरीही पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने सुमारे ५९ टक्के खरिपाचे क्षेत्र पेरणीअभावी पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़ सध्या जिल्ह्यात चिंतेचे वातावरण असून, मोठ्या पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत़मागील वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी करूनही अपेक्षित उत्पादन मिळाले नव्हते़ तर रबी हंगामात पावसाअभावी पेरणीच झाली नव्हती़ जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा ३० टक्के पाऊस कमी झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली़ खरीप आणि रबी या दोन्ही हंगामात मोठे नुकसान सहन केल्यानंतर यावर्षीच्या खरीप हंगामातून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या़ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला़ त्यामुळे सलग दोन वर्षापासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाºया येथील शेतकºयांनी यावर्षीच्या हंगामातून मोठ्या अपेक्षा ठेवल्या आहेत़ मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच शेतकरी खरीप पेरण्यांच्या तयारीला लागले़ शेत जमिनींची मशागत करण्यात आली़ बी-बियाणे, खतांची खरेदीही झाली आहे़ मात्र पावसाने खोडा घातल्याने जिल्हाभरात चिंतेचे वातावरण आहे़ जून महिन्यात थोडाफार पाऊस झाला असला तरी जमिनीत ओल निर्माण झाली नाही़ मृग नक्षत्रापासूनच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत़ मात्र अद्यापही मोठा पाऊस झाला नाही़जून महिन्यामध्ये झालेल्या अल्प पावसावर काही शेतकºयांनी कापूस लागवडीचे धाडस केले आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत ४१ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी त्यात कापसाचीच सर्वाधिक लागवड आहे़ अनेक भागांत धूळ पेरण्या करण्यात आल्या़जुलै महिन्यातील पहिला आठवडा सरला तरीही दमदार पाऊस झाला नाही़ त्यामुळे सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांच्या पेरण्या रखडल्या आहेत़ जिल्ह्यात सद्यस्थितीला झालेल्या ४१ टक्के पेरण्या वगळता उर्वरित ५९ टक्के क्षेत्र पेरणीअभावी पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़ त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागते की काय, या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत़१ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरणी४परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये ५ लाख २१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र खरीपाच्या पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे़ त्यापैकी १ लाख ७७ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत़ उर्वरित क्षेत्रावर पेरण्या करण्यासाठी आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकºयांना लागली आहे़४कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यामध्ये कापसाची लागवड सर्वाधिक झाली आहे़ परभणी तालुक्यात १३ हजार ९०० हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे तर गंगाखेड तालुक्यात ७ हजार ४०० हेक्टर, पाथरी १३ हजार ४०० हेक्टर, जिंतूर ३ हजार ५००, पूर्णा ४ हजार ५००, पालम ७०० हेक्टर, सेलू २५ हजार ७०० हेक्टर, सोनपेठ १० हजार ७०० हेक्टर आणि मानवत तालुक्यात १७ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे़४काही भागात बाजरी, ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची पेरणी झाली आहे़ उर्वरित क्षेत्रात पेरणीसाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा केली जात असून, सध्याची परिस्थिती पाहता शिल्लक राहिलेले ५९ टक्के क्षेत्र पडिक राहण्याची भीती निर्माण झाली आहे़जिल्ह्यात आतापर्यंत १२ टक्के पाऊसपरभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४़६२ मिमी असून, सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ १२़५ टक्के पाऊस झाला आहे़ गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक १७़९ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ तर सोनपेठ तालुक्यामध्ये १६़९ टक्के, मानवत तालुक्यात १५ टक्के, जिंतूर ११़७ टक्के, पूर्णा १२़४, पालम १२़२ टक्के, पाथरी १०़९ टक्के, परभणी १०़६ टक्के आणि सेलू तालुक्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ७़६ टक्के पाऊस झाला आहे़ १ जूनपासून ८ जुलैपर्यंत जिल्ह्यात ९७़१८ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ गंगाखेड तालुक्यात सर्वाधिक १२४़५० मिमी पाऊस झाला असून, त्याखालोखाल मानवत तालुक्यात १२२़३३ मिमी पाऊस झाला आहे़ तालुक्याच्या अपेक्षित पावसाच्या तुलनेत गंगाखेड आणि सोनपेठ या दोनच तालुक्यांत चांगला पाऊस झाला असून, उर्वरित तालुक्यांत मात्र पावसाने पाठ फिरविली आहे़१५ जुलैपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाल्यास शेतकºयांना कापूस, तूर, सोयाबीन ही पिके घेता येतील़ शेतकºयांनी कमी कालावधीचे वाण पेरणीसाठी निवडावे़ तसेच अंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा़-यु़एऩ आळसे, कृषी विद्यावेत्ता, वनामकृवि, परभणी

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीRainपाऊस