लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तालुक्यासाठी सुरु केलेल्या शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मुदतीअखेर ५९८.६६ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली आहे. २७१ शेतकऱ्यांनी हमीदराने मूग विक्री केला आहे.जिल्ह्यात यावर्षी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र उशिराने सुरु झाले. त्यामुळे अनेक शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची विक्री करावी लागली. वारंवार मागणी करुनही हमीभाव खरेदी केंद्र सुरु होत नसल्याने अनेक शेतकºयांनी नोंदणी केल्यानंतरही खाजगी बाजारपेठेत शेतमाल विक्री केला आहे. परभणी तालुक्यासाठी येथील खरेदी- विक्री संघामध्ये १७ डिसेंबर रोजी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. या केंद्रावर मुगाची विक्री करण्यासाठी ६१५ शेतकºयांनी नोंदणी केली होती. २३ डिसेंबरपर्यंत मूग खरेदी करण्याची मुदत देण्यात आली होती. प्रत्यक्षात या तारखेपर्यंत सर्व शेतकºयांच्या मुगाची खरेदी होऊ शकली नाही. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ६१५ पैकी केवळ २७१ शेतकºयाचा मूग हमीभावाने खरेदी करण्यात आला आहे. उर्वरित सर्व शेतकºयांची खरेदी होऊ शकली नाही.यावर्षी परभणी जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातच पावसाने हात दिल्यामुळे पिके हाती लागली नाहीत. जो शेतीमाल शेतकºयांच्या पदरात पडला त्याला किमान हमीभाव मिळावा, अशी शेतकºयांची अपेक्षा होती. त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली; परंतु, हमीभाव खरेदी केंद्र वेळेत सुरु झाले नाही. १७ डिसेंबर रोजी परभणी तालुक्यातील हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. केवळ आठच दिवस या केंद्रावर खरेदी करण्यात आली. माल विक्री करण्यासाठी शेतकºयांकडे पुरेसा वेळ उपलब्ध नव्हता. त्यामुळे सर्व शेतकºयांच्या मुगाची खरेदी होऊ शकली नाही. परिणामी अनेक शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दराने मूग विक्री करावा लागला. उर्वरित शेतकºयांना फरकाची रक्कम द्यावी, अशी मागणी होत आहे.मुदत संपल्याने : ३४४ शेतकºयांना आर्थिक फटकापरभणी तालुक्यासाठी सुरु करण्यात आलेले हमीभाव खरेदी केंद्र केवळ आठच दिवस चालले. या केंद्रावर ६१५ शेतकºयांनी नोंदणी केली होती. मुगाला ६ हजार ९७५ प्रति क्विंटल असा हमीभाव शासनाने जाहीर केला आहे; परंतु, खरेदी करण्यासाठी कमी कालावधी असल्याने सर्व शेतकºयांच्या मुगाची खरेदी होऊ शकली नाही. यामुळे तब्बल ३४४ शेतकºयांना हमीभावापेक्षा कमी दराने मुगाची विक्री करावी लागली. शासनाच्या धोरणामुळे या शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. दरम्यान, या संदर्भात हमीभाव खरेदी केंद्राशी संपर्क साधला असता सर्व शेतकºयांना खरेदीसाठी भ्रमणध्वनीवर मेसेज टाकले होते; परंतु, शेतकºयांनी वेळेत आपला माल विक्रीसाठी आणला नसल्याचे सांगण्यात आले.
परभणी : ५९८ क्विं. मुगाची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 1:28 AM