शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

परभणी : ६२ सीसीटीव्हींचे बोरी गावावर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:25 AM

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी ग्रामस्थ, व्यापारी व ग्रामपंचायत कार्यालयाने १० लाख रुपयांचा निधी खर्च करुन ८ मार्च रोजी ६२ सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाच्या ठिकाणी बसविले आहेत. त्यामुळे या कॅमेऱ्याद्वारे बोरी येथील प्रत्येक घडामोडींवर लक्ष राहणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील बोरी येथील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी ग्रामस्थ, व्यापारी व ग्रामपंचायत कार्यालयाने १० लाख रुपयांचा निधी खर्च करुन ८ मार्च रोजी ६२ सीसीटीव्ही कॅमेरे महत्वाच्या ठिकाणी बसविले आहेत. त्यामुळे या कॅमेऱ्याद्वारे बोरी येथील प्रत्येक घडामोडींवर लक्ष राहणार आहे.जिंतूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून बोरी ग्रा.पं. ओळखली जाते. बोरी येथे मागील काही दिवसांत गुन्हेगारीच्या मोठ्या घटना वाढल्या होत्या. यामध्ये एका बालिकेवर अत्याचाराची घटनाही घडली होती. त्याच बरोबर भर वस्तीतून घरासमोरील बैलजोडी चोरीला जाणे आदी घटना घडल्या होत्या. या घटनांचा छडा लावताना पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागली होती. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी, गुन्हेगारीला आळा बसावा, या हेतुने ग्रामपंचायत कार्यालय, व्यापारी, ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन १० लाख रुपयांचा निधी उभारला. या निधीतून ६२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची खरेदी करण्यात आली. हे कॅमेरे बोरी गावातील बाजारपेठ, शाळा, विद्यालय, मंदिर यासह मोक्याच्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. यावेळी आ.विजय भांबळे, जि.प.अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, जि.प. सदस्य अजय चौधरी, सरपंच सखाराम शिंपले, उपसरपंच अश्विनीताई चौधरी, सुभाष घोलप, मनोज थिटे यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टॅग्स :parabhaniपरभणीcctvसीसीटीव्ही