शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

परभणी : पालममधील ६४ गावांचा पाणीप्रश्न लागणार मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:11 AM

शहरासह तालुक्यातील ६४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. शासनाने लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर केली असून ३१ जानेवारी रोजी या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): शहरासह तालुक्यातील ६४ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागणार आहे. शासनाने लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर केली असून ३१ जानेवारी रोजी या कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.येथील खरेदी- विक्री संघाच्या कार्यालयात मंगळवारी ही पत्रकार परिषद घेण्यात आली. रोकडे म्हणाले, मार्च महिना सुरु होताच तालुक्यात पाणीटंचाई सुरु होते. त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे ६४ गाव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव दाखल केला होता. शासनाने ५४ कोटी रुपयांची लिंबोटी धरण ते पालम शहरासह ६४ गावांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. ३१ जानेवारी रोजी या योजनेचे भूमिपूजन होणार असून या योजनेमुळे तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार आहे, असे गणेशराव रोकडे यांनी सांगितले. यावेळी डॉ.रामराव उंदरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे, नगरसेवक गजानन रोकडे, विश्वंभर बाबर, डॉ.बडेसाब शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणी