लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (प२भणी) : गोदावरी नदीपात्रातून शेतीसाठी अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या ढालेगाव आणि रामपुरी येथील ६५ कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महसूलच्या पथकाने केली आहे.पाथरी तालुक्यात यावर्षी पावसाने खंड दिल्याने सरासरीच्या तुलनेत केवळ ५३ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने या तालुक्यात गंभीर दुष्काळही जाहीर केला आहे. तालुक्यातील जलसाठे, मध्यम लघु तलावातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आले असून या पाण्याचा अवैध उपसा रोखण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय दोन पथकेही स्थापन करण्यात आली असून तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. त्यात महसूल, महावितरण आणि जायकवाडीतील अधिकाºयांचा समावेश आहे.१७ नोव्हेंबर रोजी गोदावरी पात्रात सुरु असलेल्या ६५ कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करुन मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. नायब तहसीलदार ए.एन. नवगिरे, जायकवाडीचे शाखा अभियंता एम.बी. कलशेट्टी, महावितरणचे अभियंता सुनील चौरे, नितेश रायपुरे, मंडळ अधिकारी जे.डी. बिडवे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे कृषीपंपधारकांचे धाबे दणाणले आहेत.ढालेगाव, रामपुरीयेथे कारवाईगोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव कार्यक्षेत्रात रामपुरी येथील ५ विद्युत रोहित्रांवरील ४० कृषीपंप आणि ढालेगाव येथील दोन विद्युत रोहित्रांवरील १५ कृषी पंपांचा वीजपुरवठा तोडण्यात आला. झरी येथील तलावात मात्र एकही कृषीपंप आढळला नाही....तर जप्तीची कारवाईपाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजवाणी करण्यासाठी गोदाकाठच्या भागात अवैध पाणीउपसा रोखला जात आहे. गोदावरी काठावरील सर्व गावांमध्ये दवंडी देऊन या संदर्भात सूचना दिल्या आहेत. यापुढेही पाणी उपसा सुरु राहिला तर जप्तीची कारवाई केली जाईल, असे पथकप्रमुख नायब तहसीलदार ए.एन. नवगिरे यांनी सांगितले.
परभणी : ६५ कृषीपंपांची तोडली वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:07 AM