लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या ९०७ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली़परभणी लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक आयोगाने निरीक्षक म्हणून उत्तर प्रदेशातील आयएएस अधिकारी राजेंद्रकुमार सिंग यांची नियुक्ती केली आहे़ सिंग यांनी बुधवारी दुपारी विविध उमेदवारांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली़ त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली़ यावेळी ते म्हणाले की, परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पहिली सरळमिसळ २५ मार्च रोजी करण्यात आली असून, ३१ मार्च रोजी दुसºयांदा सरमिसळ केली जाणार आहे़ निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाºयांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले असून, या प्रशिक्षणाला ९०७ कर्मचारी गैरहजर राहिले़ त्यांना प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़ काही कर्मचाºयांनी विविध कारणास्तव निवडणुकीच्या कामातून सूट मिळावी, असे अर्ज केले आहेत; परंतु, यावर अद्याप निर्णय झालेला नाही़ परभणी लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक आयोगाने राजेंद्रकुमार सिंग यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून, ते निवडणुकीच्या कालावधीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विज्ञान भवन येथे वास्तव्यास राहणार आहे़ निवडणुकी संदर्भात काही तक्रार असल्यास त्यांच्या ९०७५०१५२२४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल़ तसेच ङ्मुॅील्लस्रं१ुँंल्ल्र2019@ॅें्र’.ूङ्मे या मेलवरही तक्रारी करता येतील़ आचारसंहिता भंगाचे आतापर्यंत ७ गुन्हे दाखल झाले असून, सिव्हीजील अॅपच्या माध्यमातून १५ तक्रारी आल्या आहेत़ त्यातील एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, बाकीच्या तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत़ या पत्रकार परिषदेस केंद्रीय निवडणूक निरीक्षक राजेंद्रकुमार सिंग, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी महादेव किरवले आदींची उपस्थिती होती़ठराविक तीन दिवसांना खर्च जमा करावा लागणारलोकसभेची निवडणूक लढविणाºया उमेदवारांना त्यांच्या दैनंदिन खर्चाची इत्भंूत नोंद ठेवावी लागणार आहे़ निवडणूक आयोगाच्या वतीने सर्व उमेदवारांना खर्च दाखल करण्यासाठी तीन तारखा ठरवून दिल्या जातील़ त्या तारखा केंद्रीय निवडणूक निरीक्षकांशी चर्चा केल्यानंतर जाहीर केल्या जातील़ निश्चित केलेल्या तीन तारखांमध्ये त्यांना खर्च करावा लागणार आहे़ उमेदवारांनी नव्याने उघडलेल्या बँक खात्यातूनच खर्चाचा तपशील सादर करावयाचा आहे़९४ संवेदनशील मतदान केंद्रपरभणी लोकसभा मतदार संघात एकूण २ हजार १६८ मतदान केंद्र असून, त्यापैकी ९४ मतदान केंद्र सद्यस्थितीत संवेदनशील असल्याचा अहवाल सहाय्यक निवडणूक अधिकाºयांनी दिला आहे़ त्यामध्ये सर्वाधिक ३९ मतदान केंद्र घनसावंगी विधानसभा मतदार संघात आहेत़ संवेदनशील मतदान केंद्रांची अंतीम निश्चिती २८ मार्च रोजी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्या बैठकीत होणार असल्याचे ते म्हणाले़
परभणी: ९०७ गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:06 AM