लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्याच्या मतदार यादीचे पुनर्रिक्षण करण्यात आले असून, त्यात १ हजार पुरुष मतदारांच्या मागे ९२४ महिला मतदारांचा समावेश झाला आहे़ तसेच या मतदार यादीमध्ये ५३ हजार ८५२ नवीन मतदारांची वाढ झाली असून, ३१ जानेवारी रोजी अंतीम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी दिली़या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी महादेव किरवले उपस्थित होते़ जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर म्हणाले, मतदार यादीचा पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविला़ त्यात मयत, स्थलांतरित व दुबार असलेली नावे वगळण्यात आली असून, नवीन मतदारांचीही यादीमध्ये नोंदणी झाली आहे़ त्यानुसार ५३ हजार ८५२ मतदार वाढले आहेत़ जिल्ह्यात आता १३ लाख ७६ हजार १५१ मतदार यादीत समाविष्ट झाले असून, त्यामध्ये ७ लाख १५ हजार २४९ पुरुष आणि ६ लाख ६० हजार ८९१ महिला मतदारांचा समावेश आहे़ १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीमध्ये महिला मतदारांचे पुरुष मतदारांशी हजारी प्रमाण ९२२ एवढे होते़ नवीन यादीत दोनने वाढ झाली असून, दर हजारी पुरुषांमागे ९२४ मतदार असे गुणोत्तर असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली़ त्याच प्रमाणे मतदार यादीतील मयत, स्थलांतरित, दुबार नावे असलेली अशी सुमारे ९ हजार ७१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत़ अपंग मतदारांची विशेष नोंदणी करण्यात आली असून, २ हजार ९५० अपंग मतदारांची नोंदणी झाली आहे़निवडणुकीसाठी १० हजार १३० कर्मचाºयांची आवश्यकता असून, प्रशासनाकडे १५ हजार ५६७ कर्मचारी उपलब्ध आहेत़ यावर्षी प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर करून मतदान होणार असून, डिसेंबर महिन्यापासून सुरू असलेल्या जनजागृती अंतर्गत ८९ हजार ४८६ मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून पाहिले आहे़टोल फ्री क्रमाक केला उपलब्धमतदार यादीतील नावे आणि निवडणूक विषयक कामांसंदर्भात जिल्हा प्रशासनाने १९५० हा टोल फ्री क्रमांक मतदारांसाठी उपलब्ध करून दिला आहे़ या क्रमांकावर फोन करून मतदारांना यादीतील त्यांचे नाव, मतदान केंद्राची खात्री करून घेता येणार आहे़मोबाईल अॅपही होणार कार्यान्वितयंदाच्या निवडणुकीसाठी मतदारांना वापरण्यासाठी सी व्हिजील हे मोबाईल अॅप उपलब्ध करून दिले आहे़ आचारसंहिता लागू झाल्यानंतर हे अॅप मतदारांना वापरता येणार आहे़ आचारसंहिता भंग होत असेल तर अशा ठिकाणचे फोटो, व्हिडीओ अॅपवर टाकून मतदारांना संबंधितांची तक्रार करता येणार आहे़, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले़
परभणी : हजार पुरुषांमागे ९२४ महिला मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:48 PM