शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

पारभणी : पावसाळ्याच्या तोंडावर ९४ टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:01 AM

शनिवारपासून प्रत्यक्षात पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी जिल्ह्यातील पाणीटंचाई अद्यापही हटली नसून ग्रामीण भागातील ९४ टंचाईग्रस्त गावांना ९४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या संख्येवरुनच यावर्षीच्या पाणीटंचाई गांभीर्य समोर येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शनिवारपासून प्रत्यक्षात पावसाळ्याला सुरुवात झाली असली तरी जिल्ह्यातील पाणीटंचाई अद्यापही हटली नसून ग्रामीण भागातील ९४ टंचाईग्रस्त गावांना ९४ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या संख्येवरुनच यावर्षीच्या पाणीटंचाई गांभीर्य समोर येत आहे.येलदरी, निम्न दुधना, करपरा, मासोळी या प्रमुख प्रकल्पांवर परभणी जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची आणि शेती सिंचनाची भिस्त आहे. मात्र मागील काही वर्षांपासून प्रकल्पांत पाणीसाठा होत नसल्याने टंचाई वाढत चाललेली आहे. मागील वर्षीच्या पावसाळी हंगामात सरासरीच्या ३३ टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील एकाही प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच जिल्ह्याला पाणीटंचाईने ग्रासले. येलदरी प्रकल्पामध्ये शिल्लक असलेले पाणीही संपले असून निम्न दुधना प्रकल्पाचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पाणीटंचाईची तीव्रता वाढत चालली आहे.पावसाळा तोंडावर आला आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविल्याने नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर प्रकल्पांमध्ये पाणीसाठा होण्याइतपत मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने पाणीटंचाईला पूर्णविराम मिळेल. सध्या तरी जिल्ह्यातील ९४ गावांमध्ये ९४ टँकरच्या सहाय्याने प्रशासन टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करीत आहे. याशिवाय विहीर अधिग्रहण, नळ योजनांची दुरुस्ती आदी माध्यमातून पाणीटंचाईवर मात करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्यापपर्यंत मान्सूनचा पाऊस झाला नसल्याने आणखी किमान १५ दिवस जिल्हा प्रशासनाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल, अशी शक्यता आहे.पालम तालुक्यात सर्वाधिक टँकर४पाणीटंचाईची सर्वाधिक झळ पालम तालुक्याला बसली आहे. गोदावरी नदीच्या पाण्यावर संपूर्ण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची भिस्त आहे. मात्र गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडल्याने पालम तालुक्यात टंचाई वाढली आहे.४ सध्या तालुक्यातील १५ गावे आणि ७ वाड्यांना २३ टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल जिंतूर तालुक्यातील १६ गावांना १६ टँकर, पूर्णा तालुक्यातील ११ गावांना १४, गंगाखेड तालुक्यातील ६ गावे आणि ८ वाड्यांना १४.४ सेलू तालुक्यातील १० गावांना ११, मानवत तालुक्यातील ६ गावांना ६, सोनपेठ तालुक्यातील ५ गावांना ५, परभणी तालुक्यातील ६ गावांना ४ आणि पाथरी तालुक्यात एका टँकरने पाणीपुरवठा होत आहे.सव्वा लाख: ग्रामस्थांना टँकरचे पाणी४जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने टँकर सुरु केले आहे. ज्या गावामध्ये कोणताही पाणीस्त्रोत उपलब्ध नाही, अशा गावांना दूर अंतरावरुन टँकरने पाणी आणून पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील १ लाख २५ हजार १७ ग्रामस्थांना टँकरचे पाणी दिले जात आहे.४त्यामध्ये परभणी तालुक्यातील ९७९, पालम २६ हजार ५५३, पूर्णा १६ हजार ४५२, गंगाखेड ८ हजार ३७२, सोनपेठ ८ हजार ३०३, सेलू ३३ हजार ४७९, जिंतूर २१ हजार ९६ आणि मानवत तालुक्यातील ९ हजार ७८३ ग्रामस्थांना टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.ही आहेत जिल्ह्यातील टँकरग्रस्त गावे४परभणी तालुका- गोविंदपूर, सारंगपूर, इस्माईलपूर, पेडगाव, सिंगणापूर, माळसोन्ना. पालम तालुका-चाटोरी, नाव्हा, आनंदवाडी, रामापूर तांडा, पेंडू खु., सादलापूर, पेंडू बु., बांदरवाडी, पेठशिवणी, पेठपिंपळगाव, सातेगाव, कापसी, पारवा, फुरतलाव तांडा, गंजी तांडा, पायरीका तांडा, वाडी बु., मार्तंडवाडी, नरहटवाडी, सेलू वलंगवाडी, कोळेवाडी.४पूर्णा तालुका- पिंपळा लोखंडे, बरबडी, देगाव, आहेरवाडी, गोविंदपूर, हिवरा, पांगरा लासीना, पिंपळा भत्या, धानोरा, गौर, वाई लासीना. गंगाखेड तालुका- गोदावरी तांडा, उमलानाईक तांडा, खंडाळी, विठ्ठलवाडी, इळेगाव, गुंडेवाडी, सिरसम शेख, गणेशपुरी मठ, सुरळवाडी, महातपुरी तांडा, उमटवाडी, ढवळकेवाडी, फत्तूनाईक तांडा, घटांग्रा तांडा.४सोनपेठ तालुका- नरवाडी, कोथाळा, खपाट पिंपरी, डिघोळ, वंदन. पाथरी तालुका- रेणाखळी. सेलू तालुका- तळतुंबा, वालूर, पिंपरी गौंडगे, नागठाणा, कुंभारी, पिंपळगाव गोसावी, गुळखंड, मोरेगाव, शिराळा, देवगाव. जिंतूर तालुका- मांडवा, करवली, कोरवाडी, देवसडी, मोहाडी, वाघी धानोरा, वडी, घागरा, भोसी, पांगरी, पानमोडी, गणपूर, सावंगी भांबळे, पाचलेगाव, चारठाणा, शेवडी. मानवत तालुका- पाळोदी, सोनुळा, हातळवाडी, सावळी, कोल्हा, करंजी.

टॅग्स :parabhaniपरभणीRainपाऊसwater scarcityपाणी टंचाई