लोकमत न्यूज नेटवर्कझरी : परभणी तालुक्यातील झरी येथील एका शेतकºयाकडे वीज जोडणी नसतानाही ५७ हजार २२० रुपयांचे वीज बिल दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.परभणी तालुक्यातील झरी येथील शेतकरी दत्ता विठ्ठलराव बोरकर यांनी ३१ डिसेंबर २००९ मध्ये कृषीपंपाकरीता वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणकडे कोटेशन भरणा केला होता. यासोबत लागणारी कागदपत्रेही दिली होती. ९ वर्षाचा कालावधी उलटला तरीही शेतकºयांच्या शेतामध्ये महावितरणने विजेचा खांब अथवा तारांची जोडणीही केली नाही. वारंवार पाठपुरावा करुनही उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. सध्या महावितरणच्या वतीने वीज बिल वसुली मोहीम सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी महावितरणने २४ जानेवारी २०१८ पर्यंतचे ५७ हजार २२० रुपयांचे बिल या शेतकºयास दिले आहे. वीज बिल पाहून शेतकरी चक्रावून गेला आहे.शेतामध्ये कोणताही विजेचा खांब अथवा वीज तारा जोडणी नसताना बिल आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणी शहनिशा करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी दत्ता बोरकर यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याकडे केली आहे.एरंडेश्वर येथेही १९ हजारांचे बिलझिरोफाटा- पूर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथील नारायण मुंजाजी काळे या शेतकºयालाही ३१ जुलै २०१७ पर्यंतचे १९ हजार ९१० रुपयांचे बिल देण्यात आले आहे. नारायण काळे यांनी ३० डिसेंबर २०१४ रोजी ६ हजार ४०० रुपयांचे कोटेशन भरुन पावती घेतली होती. परंतु, या संदर्भात महावितरणने काळे यांना वीज जोडणी दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी काळे यांनी अधीक्षक अभियंत्याकडे केली आहे.
परभणी : जोडणी नसतानाही ५७ हजारांचे बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:02 AM